उपवन तलाव येथील ‘अॅम्पी थिएटर’चा लोकार्पण सोहळा
गजल नवाज भीमराव पांचाळे यांच्या गजल संध्या कार्यक्रमाचे आयोजन
ठाणे (15) : ठाणे जिल्ह्यातील कला, संस्कृती आणि सांस्कृतिक कलाविष्कारांना प्रोत्साहन देण्यासाठी तसेच रसिकांना दर्जेदार कार्यक्रमांची मेजवानी मिळावी यासाठी ठाणे महानगरपालिकेच्या विद्यमानाने प्रभाग क्र. 5 मधील उपवन तलावाजवळ नव्याने अॅम्पी थिएटर उभारण्यात आले असून दिनांक 16 मे 2018 रोजी दुपारी 12 वाजता सदर थिएटरच्या लोकार्पण सोहळयाचे आयोजन करण्यात आले आहे. ठाणे जिल्ह्याचे सार्वजनिक बांधकाम (सार्वजनिक उपक्रम) तथा पालकमंत्री एकनाथ शिंदे यांच्या हस्ते हा लोकार्पण सोहळा पार पडणार आहे.
दरम्यान यानिमित्ताने सायंकाळी 6 वाजता प्रसिद्ध गजलगायक पंड़ीत भीमराव पांचाळे यांच्या गजल गायनाचा कार्यक्रम आयोजित करण्यात आला आहे. ठाणे शहराला नाटयगृह, नाटकं आणि वेगवेगळया कलाविष्कारांची, सादरीकरणाची परंपरा आहे. तीच परंपरा पुढ़े चालविण्यासाठी अॅम्पी थिएटर उपयुक्त ठरणार आहे.
दरम्यान या कार्यक्रमाचे अध्यक्षस्थान महापौर मिनाक्षी शिंदे भूषवणार असून खासदार राजन विचारे, श्रीकांत शिंदे, विनय सहस्त्रबुद्धे, आमदार प्रताप सरनाईक, जितेंद्र आव्हाड, संजय केळकर, सुभाष भोईर, निरंजन डावखरे, रविंद्र फाटक, उपमहापौर रमाकांत मढवी, सभागृह नेते नरेश म्हस्के, विरोधी पक्षनेते मिलिंद पाटील, ठाणे महानगरपालिका आयुक्त संजीव जयस्वाल, वर्तकनगर प्रभाग समिती अध्यक्षा रागिणी बैरीशेट्टी, स्थानिक नगरसेवक नरेंद्र सुरकर, नगरसेविका जयश्री डेविड, परिषा सरनाईक, अतिरिक्त आयुक्त (1) सुनील चव्हाण, अतिरिक्त आयुक्त (2) समीर उन्हाळे हे मान्यवर विशेष अतिथी म्हणून उपस्थित राहणार आहेत.