उद्या रविवारी रेल्वेच्या तिन्ही मार्गांवर मेगाब्लॉक
मुंबई -तांत्रिक कार्यासाठी उद्या रविवारी २२एप्रिलला रेल्वेच्या तिन्ही मार्गांवर मेगाब्लॉक घेण्यात येणार आहे. मध्य रेल्वेच्या मुख्य मार्गावर सकाळी ११.१० ते संध्याकाळी ४.१० वाजेपर्यत मुलुंड ते माटुंगा अप धीम्या मार्गावर मेगाब्लॉक घेण्यात आला असून, यादरम्यान कल्याण स्थानकातून सुटणाऱ्या धीम्या लोकल मुलुंड ते माटुंगा दरम्यान अप जलद मार्गावर चालविण्यात येतील. अप धीम्या मार्गावरील नाहूर, कांजुरमार्ग, विद्याविहार स्थानकात लोकल गाड्यांना थांबा देण्यात येणार नाही.तर हार्बर मार्गावर सकाळी ११.१० ते संध्याकाळी ४.१० वाजेपर्यत कुर्ला ते वाशी अप आणि डाऊन मार्गापर्यंत ब्लॉक घेण्यात आला आहे. त्यामुळे सीएसटी ते पनवेल, बेलापूर, वाशी दरम्यान अप-डाऊन मार्गावरील लोकल गाड्या रद्द करण्यात आल्या असून, छत्रपती शिवाजी महाराज टर्मिनस ते कुर्ला आणि वाशी ते पनवेलदरम्यान विशेष लोकल सोडण्यात आल्या आहेत.आणि पश्चिम रेल्वे मार्गावर सकाळी १०.३५ ते दुपारी ३.३५ वाजेपर्यत हा ब्लॉक घेण्यात आला असून, बोरिवली ते गोरेगावदरम्यान अप आणि धीम्या मार्गावर हा ब्लॉक असणार आहे. त्यामुळे बोरिवली ते गोरेगावदरम्यान अप आणि डाऊन धीम्या मार्गावरील लोकल जलद मार्गावर वळविणाण्यात येणार आहेत. तर बोरिवली स्थानकातील फलाट क्रमांक एक ते चार नंबरवर तसेच राम मंदिर स्थानकातही कोणतीही लोकल थांबणार नाही.