उच्चदाब ग्राहकांनी ऑनलाईनद्वारे वीजबील भरताना खबरदारी घ्यावी : महावितरणचे आवाहन

पुणे दि.०९ :- उच्चदाब ग्राहकाची ऑनलाईन वीजबिलाच्या प्रकरणात फसवणूकीचा प्रयत्न झाल्याचे उघडकीस आले असून त्यामुळे ऑनलाईन वीजबील भरताना महावितरणच्या उच्चदाब ग्राहकांनी खबरदारी घ्यावी, असे आवाहन महावितरणने केले आहे. महावितरणच्या पुणे येथील एका उच्चदाब वीजग्राहकाची बनावट ई-मेलद्वारे बँकेचे बनावट खाते क्रमांक व इतर माहिती कळवून फसवणूक करण्याचा प्रयत्न करण्यात आला आहे. 

हेही वाचा :- श्रीरामजन्मभूमीविषयी येणारा सर्वोच्च न्यायालयाचा निर्णय श्रीरामनाम घेत स्वीकारा आणि समाजस्वास्थ उत्तम ठेवा ! – सनातन संस्था

महावितरणच्या व्यवस्थापनाने या प्रकरणाची गंभीर दखल घेतली असून या प्रकरणी सायबर क्राईम, शिवाजीनगर पोलीस स्टेशन, पुणे येथे तक्रार दाखल करण्यात आली आहे. खबरदारीचा उपाय म्हणून सर्व उच्चदाब ग्राहकांना महावितरणने ई-मेलद्वारे कळविले आहे.

हेही वाचा :- कौन बनेगा करोडपती कार्यक्रमात छत्रपती शिवाजी महाराजांचा एकेरी नामोल्लेख केल्याच्या निषेधार्थ निदर्शने…

सर्व उच्चदाब ग्राहकांना आरटीजीएस माध्यमातून वीजबील भरण्यासाठी महावितरणच्या एस बँक व एसबीआय बँकेचा तपशील वीजबिलावर देण्यात येतो. यामध्ये लाभार्थी (Beneficiary) खातेधारक MSEDCL आहे. तसेच एस बँकेचा लाभार्थी खाते क्रमांक MSEDCL ने सुरू होतो व एसबीआयचा लाभार्थी खाते क्रमांक MSEDHT  ने सुरू होतो.  या सर्व बाबींची खात्री करूनच उच्चदाब ग्राहकांनी आपले वीजबील RTGS द्वारे भरावे, असे आवाहन महावितणने केले आहे.

Please follow and like us:

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

error

Enjoy this blog? Please spread the word :)

Follow by Email