उघड्या खिडकीवाटे मोबाईल व दुचाकीची चावी चोरून दुचाकी केली लंपास
कल्याण : कल्याण पूर्वेकडील नांदिवली परिसरातील अनमोल गार्डनच्या मागे असलेल्या श्रीराम चाळीत राहणारे जगदीश बर्मन हे शुक्रवारी सायंकाळी घरी परतले यावेळी त्यांनी आपला मोबाईल व आपल्या दुचाकीची चावी खिडकीजवळ ठेवली होती शनिवारी सकाळी त्यांना मोबाईल व चावी न अढळल्याने त्यांनी बाहेर बघितले असता दुचाकी चोरी झाल्याचे लक्षात आले .अज्ञात चोरट्याने उघड्या खिडकीवाटे हात घालून त्यांचा मोबाईल व दुचाकीची चावी चोरून सदर दुचाकी चोरून नेली . या प्रकरणी बर्मन यांनी कोळसेवाडी पोलीस स्थानकात तक्रार दाखल केली असून या तक्रारी नुसार पोलिसांनी अज्ञात चोरट्या विरोधात गुन्हा दाखल केला आहे .
तर दुसरी घटना कल्याण पश्चिम बेतूरकर पाडा परिसारत घडली आहे .बेतूरकरपाडा परिसरात श्रीमूर्ती अपार्टममेंट मध्ये राहणारी ६४ वर्षीय महिला गुरवारी रात्री घरात झोपली असताना तिच्या बेडरूम ची खिडकी उघडी होती अज्ञात चोरट्याने या उघड्या खिडकीवाटे घरात घुसून घरातील सोन्याचे दागिने व रोकड असा मिळून एकूण ३२ हजारांचा मुद्देमाल लंपास केला .या प्रकरणी बाजारपेठ पोलीस स्थानकात तक्रार नोंदवली असून या तक्रारी नुसार पोलिसांनी अज्ञात चोरट्या विरोधात गुन्हा दाखल केला आहे.