कल्याण – कल्याण पूर्वेकडील पूना लिंक रोड गवळी नगर अक्षय चाळीत राहणारे विनय ठोकरे शुक्रवारी रात्री घराची खिडकी उघडी ठेवून घरात झोपले होते .रात्री दोन वाजण्याच्या सुमारास अज्ञात चोरट्याने खिडकी उघडी असल्याची संधीं साधत खिडकीतून हॅट घालत खिडकीवर ठेवलेला मोबाईल ,पाकीट व मोटरसायकलची चावी चोरली व या चाविने मोटर सायकल चोरुन तेथून पळ काढला .या प्रकरणी ठोकरे यांनी कोळशेवडी पोलीस स्थानकात तक्रार नोंदवली असून या तक्रारी नुसार पोलिसांनी अज्ञात चोरट्या विरोधात गुन्हा दाखल करत पुढील तपास सुरू केला आहे.