ईगल ब्रिगेड फाउंडेशनच्या वतीने  डोंबिवलीत शहर सुरक्षा अभियान

डोंबिवली – ठाणे पोलिस आयुक्त, जॉईंट सी.पी., ईस्ट रिजनचे अतिरिक्त पोलिस आयुक्त,  झोन ३ चे डीसीपी संजय शिंदे, डोंबिवलीचे सहाय्यक पोलीस आयुक्त रविंद्र वाडेकर  तसेच  डोंबिवलीतील चारही पोलिस स्टेशनचे वरिष्ठ पोलिस निरीक्षक यांच्या मार्गदर्शनाखाली एप्रिल व मे महिन्यासाठी खास शहर सुरक्षा अभियानाचे आयोजन ईगल ब्रिगेड फाउंडेशनच्या वतीने करण्यात आले होते . 
    एप्रिल व मे या सुट्टीच्या काळात घरफोडी व चोरीच्या घटना घडण्याची शक्यता असते. तेव्हा अशा घटना घडू नयेत म्हणून ईगल ब्रिगेड फाउंडेशनचे सदस्य पोलिस विभागाच्या अंतर्गत होणाऱ्या नाईट पेट्रोलिंग मध्ये सहभागी झाले.  तसेच गेल्या दोन महिन्यांपासून  विविध सोसायट्यांमध्ये जाऊन लोकांमध्ये खालील महत्वाच्या मुद्द्यांवर जनजागृती करण्यात आल्याचे फाउंडेशन  संस्थापक विश्वनाथ बिवलकर यांनी सांगितले . सेल्समन तसेच अनोळखी लोकांना घरात घेऊ नका.बाहेरगावी जात असल्याची फेसबुक, व्हॉट्सअप इत्यादी सोशल मीडियावर वाच्यता करू नका. तसा स्टेटस व फोटो टाकणे टाळा.  त्याचबरोबर  सायबर क्राईम पासून सावधान राहण्यासाठी करण्यात येणाऱ्या उपाययोजनांची माहिती देण्यात आली. कोणत्याही अफवा आणि स्कीमच्या आमिषाला बळी पडू नका. योग्य ती माहिती करून घ्या. आपल्या आजूबाजूच्या परिसरावर देखील लक्ष ठेऊन दक्ष राहण्याचे सांगण्यात आले.
त्याचबरोबर ईगल ब्रिगेडने रात्री बरोबरच सकाळी पहाटे देखील बंदोबस्ताला सुरवात केली आहे. रात्रीच्या गस्ती दरम्यान वाहनांची तपासणी, सोसायटीच्या रखवालदाराला दक्ष राहण्याच्या सूचना देण्यात आल्या. या उपक्रमाने काही प्रमाणात चोरी तसेच घरफोडीच्या घटनांना आळा बसला आहे.
Please follow and like us:

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

error

Enjoy this blog? Please spread the word :)

Follow by Email