इमारतीच्या संरक्षक भिंतीच्या कामास विरोध करत त्रिकुटाची इसमाला बेदम मारहाण

कल्याण – आमची जागा व आमचा एरिया असल्याचे सांगत इमारतीच्या संरक्षक भिंतीच्या कामला विरोध करत गावगुंडांनी इमारतीच्या रहिवाशाला लोखंडी रॉडने बेदम मारहाण केल्याच्ची घटना कल्याण पूर्व चक्की नका येथे घडलि आहे .या प्रकरणी कोळसेवाडी पोलीस स्थानकात तक्रार दखल करण्यात आली आहे.
कल्याण पूर्वेकडील चक्की नाका गोपाळ कृष्ण नगर येथील श्री गणेश अपार्टमेंट मध्ये राहणारे ओमन कुजी ४३ काल सकाळी बारा वाजण्याच्या सुमारास इमारतीच्या सुरु असलेल्या संरक्षक भिंतीच्या कामाची पाहनी करत असतांना पप्पी गवळी ,दत्ता गवळी ,रितेश गवळी हे तीघे त्या ठिकाणी आले त्यांनी या ठिकाणी काम कुनाला विचारून करतोस हि जागा व एरिया आमचा आहे ,बांधकाम बंद करा असे बोलत कुजी याना लोखंडी रॉडने बेदम मारहाण करत सोसायटीच्या इतर सदस्यांना शिवीगाळ करत मारहाण करण्याची धमकी दिली या मारहाणीत कुजी यांच्या पायाला गंभीर दुखापत झाली असुण या प्रकरणी कुजी याने कोळशेवाडी पोलीस स्थानकात तक्रार नोंदवली असून या तक्रारी नुसार पोलिसांनी  पप्पी गवळी ,दत्ता गवळी ,रितेश गवळी या तिघा विरोधात गुन्हा दखल केला आहे .
Please follow and like us:

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

error

Enjoy this blog? Please spread the word :)

Follow by Email