इन्शुरन्स पॉलीसी च्या नावाखाली पावणे चार लाखाना गंडा
कल्याण – इन्शुरन्स पोलिसीच्या नावाखाली एका महिलेला तिघा जणांनी तब्बल 3 लाख 75 हजार रुपयांना गंडा घातल्याची घटना उघडकीस आली असून या प्रकरणी बाजारपेठ पोलीस स्थानकात नोंदवण्यात आलेल्या तक्रारी नुसार पोलिसानी दीपाली शर्मा ,अवनिश, संजय मिश्रा,काजल अग्रवाल या चार जणा विरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे .
कल्याण पश्चिमेकडील बेतूरकर पाडा,भोईर कॉलनी येथे राणहऱ्या महिलेला 2013 साली काढलेल्या पॉलिसीचे पैसे परत मिळवून देतो तसेच विविध कारणे सांगत विविध सांगत वेगवेगळ्या इन्शुरन्स कंपनी मध्ये पैसे भरण्यास सांगितले तसेच या महिलेने पोलिसी काढण्यासाठी सांगितलेले नसताना 2017 पर्यंत तिची पॉलीसी काढली तसेच सर्व पॉलीसीचे पैसे परत मिलवुन देण्याचे आमिश दाखवत दीपाली शर्मा ,अवनिश, संजय मिश्रा,काजल अग्रवाल या चौघांनी सदर महिलेला वारवार फोन करत
तिला 1 लाख 80 हजार रुपये विविध बँक खात्यावर ट्रान्सफर करण्यास सांगितले .या पॉलीसीचे पैसे परत मिळतील या आशेने सदर महिलेने पैसे त्या बँक खात्यात जमा केले मात्र बराच कालावधी उलटूनही पैसे न मिळाल्याने तिला आपली फसवणूक झाल्याचे लक्षात आले .तिने काल या प्रकरणी बाजार पेठ पोलीस स्थानकात
दीपाली शर्मा ,अवनिश, संजय मिश्रा,काजल अग्रवाल या चार जणा विरोधात फसवणूक केल्याप्रकरणी तक्रार दाखल केली आहे .या तक्रारी नुसार पोलिसानी दीपाली शर्मा ,अवनिश, संजय मिश्रा,काजल अग्रवाल या चार जणा विरोधात गुन्हा दाखल करत पुढील तपास सुरू केला आहे .
Hits: 16