इंजेक्शन देऊन तरुणीवर नराधमांचा सलग वीस दिवस अत्याचार
बीड – येथील तालुक्यातील डोईफोड वाडी येथील अक्षय डोईफोडे या युवकाने नांदुरफाटा येथील पांढऱ्याचीवाडी येथील युवतीला फुस लाऊन सिनेमा स्टाईलने पळवून नेऊन नंदुरबार येथे एका बंद खोलीत पंधरा ते वीस दिवस डांबून ठेवले आणि इंजेक्शन देऊन बळजबरी करत बेशुद्ध अवस्थेत अत्याचार केला. महिनाभरापूर्वी नांदूर फाटा येथून बेपत्ता झालेल्या अठरा वर्षीय तरुणीचा काल शोध लागला असून डोईफोडवाडी च्या अक्षय डोईफोडे नावाच्या तरुणाने तिला बेशुद्ध करून पळवून नेल्याचा खळबळजनक प्रकार उघडकीस आला आहे. नेकनूर पोलिसांनी दोन तरुणांना ताब्यात घेतले आहे.सदरील तरुणीने आपल्याला इंजेक्शन देऊन बेशुद्ध करत वेळोवेळी शारीरिक अत्याचार केल्याची तक्रार पोलिसांना दिली असून या प्रकरणी गुन्हा दाखल झाला आहे.तर दुसरीकडे मुलीच्या नातेवाईकांनी एका पोलिसावर गंभीर आरोप केला आहे. नेकनूर पोलिस ठाण्यातील कर्मचारी पोलिसांसह नातेवाईकांच्या हालचाली मुलीला पळवून नेणार्या आरोपींना वेळोवेळी सांगत होता, असं नातेवाईकांचं म्हणणं आहे. नेकनूरपासून काही अंतरावर असलेल्या नांदूर फाटा येथे अठरा वर्षीय तरुणी शेतात होती. त्यादिवशी रविवार असल्याने आठवडी बाजारासाठी तिच्या घरातले सर्व सदस्य गेले होते. ती एकटी असल्याचे पाहून डोईफोडवाडी येथील तरुण अक्षय श्रीहरी डोईफोडे व अच्युत मुंडे या दोघांनी मला गुंगीचे औषध घालून मला मारहाण करून धमक्या देऊन माझ्यावर रोज माझ्या मनाविरुध्द बळजबरीने अत्याचार केल्याचा आरोप पीडित तरुणीने केला आहे.
त्याठिकाणी तिच्या तोंडाला रुमाल लावून इंजेक्शन देत बेशुद्ध केले, त्याठिकाणी उसाच्या शेतात तिच्यावर शारीरिक अत्याचार केले आणि तेथून तरुणीला गाडीत टाकून हे पसार झाले. या घटनेची माहिती घरच्यांना झाल्यानंतर त्यांनी याबाबत नेकनूर पोलिसांकडे तक्रार केली. २९ जूलै रोजी सदरची मुलगी बेपत्ता झाली होती. तिचा शोध परिवारातील लोक घेत होते. अखेर सदरची मुलगी ही गडचिरोली येथे असल्याची माहिती मिळाल्यानंतर घरच्या लोकांनी तिथे जाऊन पोलिसांच्या मदतीने तिला ताब्यात घेतले आणि नेकनूर पोलिसात आणले. यातील दोघांना पोलिसांनी ताब्यात घेतल्याचे सांगण्यात येते. पोलिसांसमोर सदरील तरुणीने दिलेल्या जबाबा मध्ये मुलीने दिलेली माहिती धक्कादायक असून तिला वेळोवेळी कुठलेतरी इंजेक्शन देण्यात येत होते, त्यात ती बेशुद्ध झाल्यानंतर तिच्यावर अत्याचार केला जात होता. तिच्या हातावर इंजेक्शनच्या अनेक खुणा आढळून आल्याचे सांगण्यात येते. गेल्या महिनाभरापासून सदरील मुलगी बेपत्ता असल्याने तिचा माग लागत नव्हता. या प्रकरणी सदरील मुलीच्या नातेवाईकांनी एका पोलिसावरच गंभीर आरोप केला आहे. नेकनूर पोलिस ठाण्यातला एक पोलिस पोलिसांच्या आणि तिच्या नातेवाईकांच्या हालचाली आरोपींना सांगत होता, असे तिच्या नातेवाईकांनी म्हंटले आहे. या प्रकरणी अक्षय डोईफोडे ; अच्युत मुंडे ; गणेश डोईफोडे आणि राम डोईफोडे रा सर्व डोईफोड वाडी यांच्या विरोधात क 363 ; 366; 376 D ; 323; 506; 34 गुन्हा दाखल झाला आसुन पुढील तपास पोलिस उप निरीक्षक सय्यद मजहर हे करत आहेत.