आ. केळकर यांच्या प्रयत्नांनी सफाई कामगारांना मिळाली आवास योजनेची घरे

ठाणे – ठाणे महानगरपालिकेत २५ वर्षे सेवा पूर्ण झालेले पात्र सफाई कामगार आणि मृत कामगारांच्या वारसांना डॉ. बाबासाहेब आंबेडकर श्रमसाफल्य आवास योजनेंतर्गत मोफत सदनिका मिळाल्या. सुमारे ५६ कुटुंबांना
आ. संजय केळकर यांच्या सातत्यपूर्ण पाठपुराव्यामुळे दिलासा मिळाला आहे. हक्काची घरे या सफाई कामगारांना लवकरच मिळणार असल्याने यंदाचा पाडवा त्यांच्यासाठी नक्कीच गोड ठरणार आहे.

नगरविकास विभागाच्या शासननिर्णयानुसार ठाण्यात ही योजना राबवण्याचा निर्णय महापालिकेने घेऊन पात्र लाभार्थींची बायोमेट्रीक पध्दतीने नोंदणी केली होती. त्यानंतर ७ जानेवारी २०१५ रोजी २७४ लाभार्थींची सोडत काढून त्यांना भायंदरपाडा आणि माजिवडा हद्दीत सदनिका देण्याचे ठामपाने जाहिर केले होते. भायंदरपाडा येथे तीन तर माजिवडा हद्दीत राबोडीमधील पंचगंगा गृहसंकुलामागे तळमजला अधिक सहा मजल्यांची इमारत बांधण्यात आली होती. ३० नोव्हेंबर २०१६ रोजी भायंदरपाडा येथील तिन्ही इमारतींमधील सदनिका पात्र लाभार्थींना वाटप करण्यात आल्या होत्या, मात्र ५६ सदनिका असलेली राबोडी येथील इमारत गेली तीन वषे पडून होती. त्यामुळे वंचित सफाई कामगार आणि वारसदार हवालदिल झाले होते. या प्रकरणी कर्मचारी आणि वारसदार यांनी अखेर भाजपाचे आमदार संजय केळकर यांच्याकडे धाव घेऊन साकडे घातले. आ. केळकर यांनी संबंधित प्रशासनाशी पाठपुरावा करुन तीन वर्षे प्रलंबित काम तीन दिवसांत कार्यान्वित केले. इमारतीला नळजोडणी, ड्रेनेज,लिफ्ट आदी विविध सुविधा मार्गी लावल्या. सध्या ही इमारत सुसज्ज असून  केळकर यांनी नुकतीच पाहणी केली. यावेळी महावितरण आणि पालिका प्रशासनाचे अधिकारी तसेच लाभार्थी मोठ्या संख्येनेउपस्थित होते. आ. केळकर यांनी अधिकार्‍यांना वीज जोडणी चे मीटर तातडीने लावण्याचे आदेश महावितरण अधिकार्‍यांना दिले असता आठवड्याभरातच वीज मीटर जोडणी पूर्ण करू असे महावितरण अधिकऱयांनी सांगितके. त्यामुळे लवकरच ही कुटुंबे त्यांच्या हक्काच्या घरात जाणार असून त्यांनी केळकर यांचे आभार मानले आहेत.

Hits: 10

Leave a Reply

Your email address will not be published.

RSS
Follow by Email