आश्रमशाळेत मुलींचा विनयभंग शिक्षकावर गुन्हा दाखल

नगर – पाथर्डी तालुक्‍यातील मढी येथील आश्रमशाळेत शिकणाऱ्या मुलींचा शाळेच्या व्यवस्थापकासह एका शिक्षकाने विनयभंग करण्याचा प्रकार काल उघडकीस आला. या घटनेतील दोन्हीही आरोपींची मुलींच्या पालकांनी धुलाई करत पोलिसांच्या ताब्यात दिले. याबाबत पोलिसांनी दिलेली माहिती अशी कि तालुक्‍यातील मढी येथे चैतन्य कानिफनाथ आश्रमशाळा असून या शाळेतील अधीक्षक नामदेव बबन धायतडक (रा.पालवेवाडी) व शिक्षक ईश्‍वर सुखदेव सुरशे (रा.चितळी ता. पाथर्डी) या दोघांनी आश्रमशाळेत पाचवी ते सातवीत शिकत असलेल्या मुलींशी काल सायंकाळी गैरवर्तन केले.

या मुली घोटन, तिसगाव व सोनईमधील आहे. यातील घोटन येथील मुलींनी आपल्या पालकांना या घटनेची माहिती देताच या मुलींचे पालक मढी येथे दाखल झाले. सर्व प्रकरणाची माहिती घेतल्यानंतर त्यांनी तिसगाव व सोनई येथील मुलींच्या पालकांना तातडीने बोलवून घेतले. या नंतर सर्वच पालकांनी या दोघा जणांची धुलाई करत पोलिसांना पाचारण केले. काल मध्यरात्री दोनच्या सुमारास एका महिलेच्या तक्रारीवरून पोलिसांनी धायतडक व सुरशे या दोघा विरोधात विनयभंग व बालकाचे लैंगिग अत्याचारापासुन संरक्षण व अनुसूचित जाती जमाती प्रतिबंधक कायद्यानुसार गुन्हा दाखल केला.

Please follow and like us:

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

error

Enjoy this blog? Please spread the word :)

Follow by Email