आशियाई क्रीडा स्पर्धेत महाराष्ट्राच्या कोल्हापूरची कन्या राही सरनोबत सुवर्णपदक पटकावले

आशियाई क्रीडा स्पर्धेत महाराष्ट्राच्या कोल्हापूरची कन्या राही सरनोबत सुवर्णपदक पटकावले आहे. २५ मी. पिस्तुल प्रकारात महाराष्ट्राच्या राही सरनौबतने सुवर्णपदकाची कमाई केली. पहिल्या फेरीपासून सर्वोत्तम खेळ करत राहीने आपलं अव्वल स्थान कायम राहिलं होतं. मात्र शेवटच्या क्षणांमध्ये थायलंडच्या प्रतिस्पर्धी खेळाडूने राहीला मागे टाकत पहिलं स्थान मिळवलं. अंतिम फेरीआधी दोन्ही खेळाडूंचे गुण समान झाले, त्यामुळे सुवर्णपदकासाठी राही आणि थायलंडच्या प्रतिस्पर्धी खेळाडूमध्ये शूटऑफवर निर्णय घेण्यात आला. पहिल्या शूटऑफमध्येही दोन्ही खेळाडूंचे ४-४ गुण झाल्यामुळे दुसऱ्यांदा शूटआऊटवर सामना खेळवण्यात आला. या शूटऑफवर राहीने ३-२ ने बाजी मारत सुवर्णपदक आपल्या नावे केलं मात्र याच प्रकारात भारताच्या १६ वर्षीय मनू भाकेरला पदकाच्या शर्यतीमधून बाहेर प़डावं लागलं. पात्रता फेरीत अव्वल दर्जाची कामगिरी करत पहिलं स्थान कायम राखलेल्या मनूला अंतिम फेरीत चांगली कामगिरी करता आली नाही. त्यामुळे भारताला संभावित एका पदकावर पाणी सोडावं लागलं. भारताच्या पारड्यात सध्या ११ पदके आहेत. भारताकडे आतापर्यंत ४ सुवर्ण, ३ रौप्य आणि ४ कास्य पदकांची कमाई झाली आहे. भारताच्या हॉकी टीमने एक नवा विश्व विक्रम आपल्या नावे केलाय. टीमने तब्बल २६ गोल करत फानलमध्ये धडक मारलीय.

Please follow and like us:

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

error

Enjoy this blog? Please spread the word :)

Follow by Email