आवाहन – बेघरांचे सर्वेक्षण करणेकामी ठाणे महापालिकेस सहकार्य करावे.

ठाणे – ठाणे महानगरपालिका क्षेत्रामध्ये व्हीमॉक्स ई-सोल्युशन इंडिया प्रा.लि. या संस्थेमार्फत शहरातील सर्व भागामध्ये जाऊन बेघरांचे सर्वेक्षण दिनांक 4/6/2019 ते 14/06/2019 या कालावधीमध्ये दिवसा / रात्री करण्यात येत आहे. बेघर तसेच निराधार व्यक्ती फूटपाथवर, चौकात, उड्डाणपुलाखाली, रेल्वेस्टेशन किंवा बसस्थानक परिसरात राहतात. ज्यांचे ठाणे महानगरपालिका क्षेत्रामध्ये कोणतेही घर नाही. जे लोक रस्त्यावर किंवा राहण्यायोग्य नसलेल्या परिस्थितीमध्ये राहतात, त्यांच्याकडे अनुकूल सुविधा नाहीत.

अशा व्यक्तींना संभावित निवारा देण्यासाठी आणि मूल्यमापन करण्याच्या कारणास्त्व बेघरांच्या सर्वेक्षणाद्वारे सर्वसाधारण, तपशील, कौटुंबिक आणि सामाजिक आर्थिक परिस्थिती, आरोग्यस्थिती संदर्भात तपशील गोळा करीत आहेत.सर्व बेघरांचे सर्वेक्षण होण्यामध्ये नागरिकांनी सहकार्य करावे तसेच कोणाला निराधार किंवा बेघर लोकं रस्तयावर किंवा इतर भागात आढळल्यास 7997007167 या क्रमांकावर संपर्क साधून सर्वेक्षणामध्ये मदत करावी ज्यामुळे महानगरपालिका क्षेत्रातील बेघरांना निवारा देण्यास मदत होईल असे आवाहन उपायुक्त तथा शहर प्रकल्प अधिकारी, दीनदयाळ अंत्योदय योजना, राष्ट्रीय नागरी उपजीविका अभियान, ठाणे महानगरपालिका यांनी केले आहे.

Please follow and like us:

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

error

Enjoy this blog? Please spread the word :)

Follow by Email