आरपीएफने बॅनर काढले तर शिवसेना धावली प्रवाश्यांच्या मदतीला …. रेल्वेपुलाच्या दुरुस्ती करण्याची मागणी

डोंबिवली दि.१३ – डोंबिवली रेल्वे स्थानकाच्या कल्याण दिशेकडील पादचारी पूल अरुंद असतानाही या पुलाचा मोठ्या प्रमाणात प्रवाशांकडून वापर केला जातो. यामुळे या पुलावर गर्दी होते. यामुळे जुन्या आणि अरुंद झालेल्या या पुलाची रुंदी वाढविण्याऐवजी आरपीएफने गुरुवारी प्रवाशांना या पुलाचा वापर बंद करण्याच्या सूचना देणारे बॅनर लावले होते. मात्र दुसऱ्या दिवशी सदर बॅनर आरपीएफनेच काढले. मात्र रेल्वे प्रवाश्यांसाठी शिवसेना धावली. खासदार डॉ. श्रीकांत शिंदे यांच्या सूचनेनुसार उपशहरप्रमुख किशोर मानकामे यांनी शुक्रवारी सायंकाळी रेल्वे पुलावर नागरिकांना आवाहन करणारे बॅनर लावले. तर ह्या रेल्वेपुलाच्या दुरुस्ती करण्याची मागणीप्रवाश्यांकडून होत आहे.

डोंबिवली पूर्व पश्चिमेला जोडणारा कल्याण दिशेकडील पूल जुना असून चालताना हा पूल कंपन पावत आहे. मात्र आता सर्वाधिक वापर असलेल्या आणि दिवसभर गर्दी असलेल्या कल्याण दिशेकडील पुलावर आरपीएफने बॅनर लावले होते. यावर पादचाऱ्यांनी या पुलाचा वापर करू नका, कारण हे पूल अरुंद असल्याने या पुलावरील गर्दी वाढत आहे. यामुळे प्रवाशांनी नवीन पुलाचा वापर करा असे आवाहन केले आहे. मात्र सकाळी लोकल पकडण्याची घाई आणि संध्याकाळी घरी परतण्याच्या घाईत असलेल्या डोंबिवलीकरांना बॅनर लहान असल्याने हे बनर वाचता येत नव्हते. गुरुवारी रात्री ९ वाजता यामुळेच प्रवाशांना या पुलावरून ये जा बंद करण्यापेक्षा या पुलाची रुंदी वाढवून डागडुजी करण्याचा प्रशासनाने विचार करावा अशी मागणी प्रवाशाकडून केली जात आहे. उपशहरप्रमुख किशोर मानकामे यांनी सदर बाब खासदार डॉ. श्रीकांत शिंदे यांना सांगितली. त्यानंतर मानकामे यांनी डोंबिवली येथील रेल्वे सुरक्षा बलाचे अधिकारी अक्षयकुमार यांची भेट घेऊन सदर बॅनर मोठे लावावे जेनेकरून प्रवाश्यांना वाचता येईल. मात्र दुसर्या दिवशी सदर बॅनर आरपीएफनेच काढले. खासदार डॉ.श्रीकांत शिंदे यांच्या सुचनेनुसार मानकामे यांनी रेल्वे पुलावर नागरिकांना आवाहन करणारे मोठे फलक लावले. शिवसेनेच्या या मदतीबाबत नागरिकांनी आभार मानले आहेत.

Please follow and like us:

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

error

Enjoy this blog? Please spread the word :)

Follow by Email