आरटीई प्रवेशाच्या पहिल्या फेरीत ५ हजार ७०२ विद्यार्थांना प्रवेश,प्रवेशाची पहिली सोडत जाहीर
ठाणे – बालकाच्या मोफत व सक्तीच्या शिक्षण हक्क अधिनियम २००९ अन्वये वंचित व दुर्बल घटकातील मुलांसाठी २५ टक्के ऑनलाईन प्रवेशाची पहिली प्रवेश सोडत (प्रथम फेरी ) आज मंगळवार दिनांक १३ मार्च रोजी ठाणे पोलीस स्कूल येथे पार पडली. यंदा पहिल्यांदाच एक किलो मीटर व त्यापेक्षा कमी अंतरातील शाळांसाठी सोडत काढत ५ हजार ७०२ विद्यार्थांना प्रवेश मिळाल्याची माहिती ठाणे जिल्हा परिषदेच्या शिक्षण विभागाने दिली.
ठाणे जिल्ह्याती 640 कायम विना अनुदानित इंगजी माध्यमाच्या शाळांमध्ये हि प्रवेश प्रक्रिया राबवण्यात येत असून पहिल्या फेरीत नाव जाहीर झालेल्या पाल्याच्या पालकांनी १४ ते २४ मार्च २०१८ पर्यंत आवश्यक कागदपत्रांसह प्रवेश निश्चित करायचे आहेत . या प्रवेश प्रक्रियेच्या काळात पालकांना काही समस्या उद्भवल्यास त्यांना शाळा स्तरावर स्थापन करण्यात आलेल्या तक्रार निवारण समितीकडे दाद मागता येणार असल्याचे शिक्षणाधिकारी मीना यादव यांनी सांगितले.