आरटीईच्या प्रवेश अर्जासाठी 7 जून शेवटची तारीख
ठाणे दि ६ जून : शिक्षण हक्क कायद्यातर्गत शाळांमध्ये आर्थिक व दुर्बल घटकातील मुलांसाठी 25 टक्के राखीव असलेल्या जागांसाठी सध्या प्रवेश प्रक्रिया राबवली जात असून प्रवेशासाठी ऑनलाईन अर्ज करण्याची 7 जून ही शेवटची तारीख असल्याचे शिक्षण विभाग ठाणे यांनी कळवले आहे.
यांना होईल फायदा
वंचित घटकांमध्ये विमुक्त जाती , भटक्या जमाती , इतर मागासवर्ग(ओबीसी ) विशेष मागास वर्ग (एसबीसी) तसेच एचआयव्ही बाधित , प्रभावीत गटातील मुलांना या प्रवेश प्रक्रियेत सहभागी होता येईल. या मुलांच्या पालकांना उत्पनाच्या दाखल्याची आवश्यकता नसेल. जात प्रमाणपत्र आवश्यक असेल.तसेच एचआयव्ही बाधितांना जिल्हा शल्य चिकित्सक तसेच समक्ष अधिकाऱ्याचे प्रमाणपत्र आवश्यक असेल.
Please follow and like us: