आयुक्तांनी केली डंम्पींग ग्राउंडची पाहणी
आधारवाडी डंम्पिगचा प्रश्न लवकरात लवकर मार्गी लावू आयुक्त गोविंद बोडके यांचे आश्वासन

यावेळी घनकचरा व्यवस्थापन विभागाचे उपायुक्त धनाजी तोरस्कर, जल अभियंता चंद्रकांत कोलते, कार्यकारी अभियंता घनश्याम नवांगुळ या अधिका-यां समवेत आयुक्तांनी चर्चा केली व घनकच-या संदर्भात सुरु असलेल्या प्रकल्पांबाबत माहिती घेतली. घनकचरा व्यवस्थापना संबधी सुरु असलेल्या इतर नियोजित प्रकल्पांना लवकरच भेटी देवुन, ते प्रकल्प देखील तातडीने कसे मार्गी लावले जातील, याचा ही देखिल त्यांनी आढावा घेतला. यादरम्यान स्थानिक महिलांनी भेटून तातडीने उपाययोजना करण्याबाबत सांगितल्यावर आयुक्तांनी डंम्पिग ग्राउंडला आग लागणार नाही , याची प्रशासन पूर्णपणे खबरदारी घेईल तसेच जंतुनाशक व दुर्गंधीनाशक फवारणी मोठया प्रमाणावर करण्यात येईल, असे सांगितले. यावेळी स्थानिक नगरसेवक तथा भाजपा गटनेते वरूण पाटील, शहर अभियंता प्रमोद कुलकर्णी, कार्यकारी अभियंता रघुवीर शेळके, अग्निशमन अधिकारी दिलीप गुंड, उपायुक्त नितीन नार्वेकर, प्रभाग क्षेञ अधिकारी विनय कुलकर्णी, प्रकाश ढोले उपस्थित होते.
Please follow and like us: