आयकर विभागाच्या कार्यालयाला आग
बलार्ड इस्टेट, सिंधिया हाऊस बिंल्डीग मध्ये 3 मजल्यावरील आयकर विभागाच्या कार्यालयाला काल सायंकाळी 04.51 वाजताच्या सुमारास आग लागली असुन सदरची आग लेवल 4 ची असल्याचे मुंबई अग्निशमन केंद्राकडुन जाहिर करण्यात आले आहे. सदर घटनास्थळी मुंबई अग्निशमन केंद्राची 16 फायर इंजिन, 10 जम्बो वॉटर टँकर उपस्थित असुन आग विझवण्याचे शर्थीचे प्रयत्न सुरु आहेत. सदर घटनास्थळी मुंबई अ.कें. चे फायरमन यशवंत दगडू भासल. (वय 55 वर्षे) व नागरिक अब्दुल मिजिद शेख.( वय 52 वर्षे) जखमी झाले असुन सदर व्यक्तीना सेंट जॉर्ज रुग्णालयात दाखल करण्यात आले आहे.
Please follow and like us: