आयआरसीटीसी ही रेल्वेची ऑनलाईन तिकीट बुकिंग साईट आज सहा तास बंद राहणार
मुंबई : आयआरसीटीसी ही रेल्वेची ऑनलाईन तिकीट बुकिंग साईट आज 2 मे रोजी रात्री 10.45 वाजल्यापासून ते 3 मे रोजी म्हणजे उद्या पहाटे 5 वाजेपर्यंत वेबसाईट बंद राहणार असून या काळात ऑनलाईन तिकीट बुक करता येणार नाही.
रेल्वेच्या पॅसेंजर रिझर्व्हेशन सिस्टमला (पीआरएस) अपडेट करण्यासाठी सदर वेबसाईट सहा तासांसाठी बंद ठेवण्यात येणार आहे. रेल्वेच्या ऑनलाईन तिकीट बुकिंग अधिक अद्ययावत करण्यासाठी ऑनलाईन सिस्टममध्ये काही नवीन फीचर्स समाविष्ट केले जातील.आयआरसीटीसी ही रेल्वेची ऑनलाईन तिकीट बुकिंग साईट आज सहा तास बंद राहणार आहे. आज 2 मे रोजी रात्री 10.45 वाजल्यापासून ते 3 मे रोजी म्हणजे उद्या पहाटे 5 वाजेपर्यंत वेबसाईट बंद राहणार असून या काळात ऑनलाईन तिकीट बुक करता येणार नाही.दरम्यान, ज्या सहा तासात वेबसाईट बंद असेल, त्या कालावधीत तिकीट बुक करता येणार नाही तसेच रद्दही केलं जाऊ शकत नाही.