आमदार बच्चू कडू यांच्या प्रहार संघटनेच्या पदाधिका-याला खंडणी प्रकरणी अटक

डोंबिवली – आपल्या स्वच्छ प्रतिमेने संपूर्ण देशभरात आपली प्रतिमा तयार करणारे आमदार बच्चू कडू यांच्या प्रहार संघटनेच्या महाराष्ट्र संघटकाला ठाणे खंडणी विरोधी पथकाने अटक केली .सुनील शिरसकर असे या पदाधिकाऱ्याचे नाव असून कल्याण नजीक असलेल्या आंबिवली येथील एका हॉस्पिटलचे बांधकाम अनधिकृत असल्याची तक्रार करत कारवाई ची धमकी देत संबंधित डॉकटर कडे दहा लाखांची खंंडणी मागितली होती .त्यामधील 2 लाखांचा हपता घेताना काल रात्री त्याला ठाणे खंडणी विरोधी पथकाने रंगेहाथ अटक केली .
काही महिन्यांपूर्वी कल्याण मध्ये आयोजित आमदार बच्चू कडू यांच्या कार्यक्रमासाठी त्याने डॉकटर कडून 40 हजार रुपये घेतल्याची धक्कादायक माहिती ही समोर आली आहे 
आमदार बच्चू कडू यांनी आपल्या आंदोलने व स्वच्छ प्रतिमेमुळे संपूर्ण राज्याच्या राजकारणात आपला दबदबा निर्माण करत जनमानसात आपले स्थान निर्माण केले .कडू यांच्या प्रहार संघटनेमार्फत कडू यांनी अनेक आंदोलने करण्यात आली.या संघटनेच्या शाखा ही आता गावो गावि विस्तारल्या आहेत .कल्याण मध्ये कार्यरत असलेल्या प्रहार संघटनेचा महाराष्ट्र संघटक सुनील शिरसकर याने मात्र या प्रतिमेला छेद दिला आहे कल्याण नजीक असलेल्या आंबिवली येथे एक गणपती हॉस्पिटल असून या हॉस्पिटलचा चौथ्या माळा अनधिकृत असल्याचे सांगत त्याने तक्रार व कारवाईची भीती दाखवत सदर रुग्णालयाचे डॉकटर एबी धोनी यांंच्याकडे तब्बल 10 लाख रुपयांची खंंडणी मागितली .इतकंच नव्हे तर काही महिन्यांपूर्वी कल्याण मध्ये आयोजित आमदार बच्चू कडू यांच्या कार्यक्रमासाठी त्याने डॉकटर कडून 40 हजार रुपये घेतले होते .याबाबत डॉकटर एबीधोनी यांनी ठाणे खंडणी विरोधी पथकाकडे तक्रार केली असता ठाणे खंडणी विरोधी पथकाने काल रात्री सापळा रचत शिरसकर याला 2 लाखांचा हप्ता घेताना अटक केली .आज शिरसकर याला कल्याण न्यायालयात हजर केले असता न्यायालयाने त्याला 26 मे पर्यंत पोलीस कोठडी सुनावली आहे. 

Hits: 23

Leave a Reply

Your email address will not be published.

RSS
Follow by Email