आपल्या देशातील श्रीमंतांनी देशाची प्रगती करण्यासाठी काय कार्य केले ?—राज्यपाल पदामानाम आचार्य

(श्रीराम कांदु)

डोंबिवली दि.२८ – आपल्या देशात गरिबी आहे गरिबी हा काही शाप नाही शिक्षणाच्या मार्गाने त्यातून बाहेर पडता येईल पण दरवर्षी १०० श्रीमंतांची नावे जाहीर होतात त्यात आपल्या देशाचे १० जण असतात मात्र त्यांनी देशासाठी काय कार्य केले ?असा सवाल नागलेंडचे राज्यपाल पद्मनाभ आचार्य यांनी येथील समारंभात केला

येथील राष्ट्रीय शिक्षण संस्थेच्या सुवर्ण महोत्सवी समारोप समारंभात प्रमुख पाहुणे म्हणून बोलत होते राजयमंत्री रवींद्र चव्हाण अध्यक्षस्थानी होते संस्थेच्या अध्यक्षा सुलभा डोंगरे ,कार्यवाह संजीव कुलकर्णी व्यासपीठावर उपस्थित होते.

राज्यपाल आचार्य पुढे म्हणाले राष्ट्रीय शिक्षण संस्था ५० वर्षे काम करत आहे. ही चांगली गोष्ट असली तरी या संस्थेने आता नागलेंडमध्ये एक तरी संस्था सुरू केली पाहिजे. आपल्या देशात शैक्षणिक संस्था विद्यापीठे खूप आहेत तरुण उच्च शिक्षण घेतात. पण ते देशासाठी काय करतात असा प्रश्न विचारून ते म्हणाले शिक्षण घेऊन नोकरी करण्यापेक्षा नोकरी देणारे व्यवसाय उद्योग सुरू करण्याची गरज आहे. आपल्या देशातील पूर्वणचल मधील लोक खूप गरीब आहेत त्यांना आपल्या देशाच्या मुख्य प्रवाहात आणण्यासाठी काम करण्याची गरज आहे. ब्रिटिशांनी त्यांना पाहिजे होती तशी शिक्षण पद्धत राबवली व आजही तीच पद्धत चालू आहे. पूर्वाचल मध्ये निसर्ग संपत्ती आहे ,मुबंईत समुद्र आहे त्यात खूप नैसर्गिक संपत्ती आहे. पण आपण त्याचा उपयोग करत नाही सर्व लोक स्वताचा विचार करत असून देशाचा विकास करण्यासाठी जातीभेद वर्णभेद विसरून एकत्र येण्याचे आवाहन त्यांनी केले.

Please follow and like us:

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

error

Enjoy this blog? Please spread the word :)

Follow by Email