आनंद बालभवन येथे कला प्रदर्शन

ज्येष्ठ पत्रकार राजेंद्र हुंजे आणि सुलेखनकार निलेश बागवे यांच्या हस्ते झाले उदघाटन

(श्रीराम कांदु)
डोंबिवली 20 डोंबिवलीतील आनंद बालभवन उमंग तर्फे 19 व 20 असे दोन दिवस कला प्रदर्शन संपन्न झाले . या कलाप्रदर्शनाचे उदघाटन ज्येष्ठ पत्रकार राजेंद्र हुंजे आणि सुलेखनकार निलेश बागवे यांच्या हस्ते झाले. 
उदघाटन प्रसंगी  राजेंद्र हुंजे यांनी कलेची स्तुती करत ज्येष्ठ कलाकारांना समाजात श्रेष्ठ स्थान मिळावे, नवोदित कलाकारांनी ज्येष्ठ कलाकारांकडून प्रेरणा घेत आपली कला वाढवावी असे त्यांनी याप्रसंगी सांगितले. त्याचबरोबर सुलेखनकार निलेश बागवे यांनी कलाकार सारे भेद विसरतो आणि आनंद वाढवतो अशा शब्दात तीनही कलाकारांची स्तुती केली. या प्रदर्शनात कलाकार दिनकर गोटल, कलाकार अरविंद खानवलकर, कलाकार किशोर कुलकर्णी यांचा सहभाग होता. यात कॅनव्हास पेंटिंग, वारली पेंटिंग, शोभिवंत वस्तू, सजावटीच्या वस्तू, टाकाउपासून टिकाऊ आकर्षक वस्तू, मंदिरांच्या प्रतिकृती, टेबल लॅम्प त्याचप्रमाणे अरविंद खानवलकर यांनी कागदाच्या बोळ्यापासून केलेल्या त्रिमित कालाकृतींमध्ये प्राणी-पक्षी, स्त्रियांच्या सुबक आकर्षक कलाकृती डोंबिवलीकरांना बघायला मिळाल्या.
कलाप्रदर्शनाला डोंबिवलीकरांचा उत्स्फूर्त प्रतिसाद मिळाला. कलाकारांना प्रदर्शनात आपल्या कलाकृती प्रदर्शित करणे खर्चिक असल्याने अनेक कलाकारांचा हिरमोड होतो ही बाब लक्षात घेता उमंग फाउंडेशनने ज्येष्ठ कलाकारांना एकत्र करत हे प्रदर्शन भरवले. या प्रदर्शनाला जास्तीत जास्त लोकांनी प्रतिसाद दिला.
Please follow and like us:

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

error

Enjoy this blog? Please spread the word :)

Follow by Email