आदिवासी भागातील अंगणवाड्यांना ‘स्मार्ट साज’

लायन्स क्लब जुहू आणि जिल्हा परिषद ठाणे महिला व बाल विकास विभाग यांचा सयुक्त उपक्रम

ठाणे दि 06 जून २०१९ : रंगकाम केलेल्या बोलक्या भींती, अंतर्बाह्य भीतींवर केलेली सजावट, आतील भागात असणारे भित्तीपत्रके, पाण्यापासून ते आसन व्यवस्थेपर्यंत असणाऱ्या दर्जेदार भौतिक सुविधा, मुलांना खेळण्यासाठी विस्तीर्ण मैदान, बैठे खेळाचे विविध साहित्य, असा अत्याधुनिक स्मार्ट साज असणाऱ्या अंगणवाड्या जिल्ह्याच्या आदिवासी भागात उभ्या राहत असल्याची माहिती महिला व बाल विकास विभाग अधिकारी संतोष भोसले यांनी दिली.

लायन्स क्लब जुहूच्या सहकार्याने जिल्ह्यातील अंगणवाड्यांचा स्मार्ट लुक पाहायला मिळणार आहे. नुकतेच जिल्हा परिषदेच्या अखत्यारीत भिवंडी, शहापूर, मुरबाड या तालुक्यातील आदिवासी क्षेत्रातील अंगणवाड्याचे उद्घाटन करण्यात आले.

सामाजिक उत्तरदायित्वाच्या भावनेतून हसमुखभाई हे गृहस्थ अकरा अंगणवाडी स्मार्ट करणार आहेत. तर दिपक शहा, प्रदिप सालोट, परेश कारिया, किरीट दोशी, धारेन दलाल, संजय दलाल, धर्मेश दिल्लीवाला हे प्रत्येकी एक अंगणवाडी स्मार्ट करणार आहेत. तर लायन्स क्लब ऑफ जुहूचे राज वांकावाला, प्रतिश देसाई, प्रेयेस नानावटी, प्रियेन शहा, दिपक दालमिया, शंभू त्रिवेदी, किरीट दोषी आदि मंडळीनी स्मार्ट अंगणवाडी बनवण्यासाठी सर्वोतोपरी मदत केली आहे.

अंगणवाडीतील बालके ही देशाची भावी पिढी आहे. बालकांच्या विकासासाठी सामाजिक उत्तरदायित्वाच्या भावनेने हातभार लावणे ही काळाची गरज असल्याचे लायन्स क्लब जुहूचे प्रेसिडेंट राज वांकावाला यांनी सांगितले.अंगणवाडीमुळे विद्यार्थांच्या पटसंख्येत वाढ होईल, तसेच अंगणवाडीचा दर्जा उंचवण्यास मदत होणार असल्याचे महिला व बाल विकास अधिकारी संतोष भोसले म्हणाले.

जिल्हा परिषद अध्यक्ष मंजुषा जाधव, उपाध्यक्ष सुभाष पवार, मुख्य कार्यकारी अधिकारी हिरालाल सोनवणे यांच्या मार्गदर्शनाखाली ही योजना राबवण्यात येत आहे.

या सुविधांनी सज्ज असणार अंगणवाडी

जिल्हा परिषदेच्या निधीतून अंगणवाड्यांमध्ये जलशुद्धीकरण यंत्र, सिलींग फॅन, धान्य कोठी, कारपेट, ग्रीन बोर्ड, घसरगुंडी, डुलता घोडा इत्यादी वस्तूंची तरतूद करण्यात आली आहे. तर लायन्स क्लबमार्फत अंगणवाडी अंतर्गत व बाह्य रंगकाम, बोलक्या भिंती, छत दुरूस्ती, भिंतीची दुरूस्ती व डागडूजी, किचन प्लॅटफॉर्म, दरवाजा व खिडक्या दुरूस्ती, आतील भिंतीवर एक फुट उंचीची लादी, लायब्ररी रॅक आदी सुविधा देण्यात येणार आहेत.

Please follow and like us:

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

error

Enjoy this blog? Please spread the word :)

Follow by Email