आता शिवसेना देखील बुलेट ट्रेनच्या विरोधात

(म.विजय)

पालघर – सध्या पालघर जिल्ह्यात लोकसभा पोटनिवडणुकीची लगबग असून त्याचाच मेळ साधून शिवसेनेने बुलेट ट्रेनला विरोध दर्शविला आहे. पालघर पोटनिवडणुकीच्या तोंडावर शिवसेनेने बुलेट ट्रेनविरोधी कृती समितीने आयोजित केलेल्या मोर्चाला पाठिंबा दिला आहे. तसेच शिवसेना या मोर्चात सहभागी होणार असल्याचे सूचित केले आहे. बुलेट ट्रेनला विरोध असण्यापेक्षा या मागील खरं कारण लोकसभा पोटनिवडणुक असल्याचं राजकीय विश्लेषक बोलत आहेत.

मुंबई – अहमदाबाद बुलेट ट्रेन विरोधी कृती समितीच्या कार्यकर्त्यांनी आज मातोश्रीवर जाऊन शिवसेना पक्ष प्रमुख उद्धव ठाकरे यांची भेट घेतली. जून महिन्यात ३ तारखेला पालघरमध्ये मोर्चाचे कृती समितीने आयोजन केलं असून त्यासाठी शिवसेनेचा पाठिंबा जाहीर केला आहे.

महाराष्ट्र नवनिर्माण सेनेने या आधीच पाठिंबा जाहीर केला असून जमीन अधिग्रहण लढ्यात सुद्धा मनसे स्थानिक शेतकऱ्यांसोबत प्रत्यक्ष आक्रमक झाली आहे आणि त्यांनी प्रत्यक्ष मैदानात उतरून सरकारचे जमीन मोजणीचे काम उधळून लावले आहे. परंतु शिवसेना पालघर पोटनिवडणुकीच्या तोंडावर या विरोधात उतरल्याने अनेक प्रश्न उपस्थित झाले आहेत.

राजकीय विश्लेषकांच्या मते शिवसेना केवळ पालघर पोटनिवडणुकीच्या तोंडावर या विरोधात उतरली असून त्याचा खरा उद्देश भाजपला पोटनिवडणुकीत कोंडीत पकडणे हाच असल्याचे म्हटले जात आहे.

Please follow and like us:

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

error

Enjoy this blog? Please spread the word :)

Follow by Email