आता दर मंगळवारी पाणी पुरवठा बंद रहाणार

आता कल्याण डोंबिवलीत दर मंगळवारी पाणी पुरवठा बंद

(म.विजय)

डोंबिवली – पाण्याचे नियोजन करण्याच्या दृष्टिकोनातून आता दर मंगळवारी कल्याण डोंबिवली महानगर पालिका क्षेत्रातील पाणी पुरवठा बंद ठेवण्यात येणार आहे.महापालिकेने प्रसिद्ध केलेल्या पत्रकात ही माहिती देण्यात आली आहे.यापूर्वी महिन्यातील पहिल्या आणि तिसऱ्या मंगळवारी पाणीपुरवठा बंद ठेवण्यात येत होता .
मात्र पाटबंधारे विभागाने घेतलेल्या नविन निर्णयानुसार आता महिन्यातील प्रत्येक मंगळवारी पाणी पुरवठा बंद राहणार असल्याची माहिती महापालिका जनसंपर्क विभागाने दिली आहे.सोमवारी रात्री 12 ते मंगळवारी रात्री 12 असा 24 तास हा पाणी पुरवठा बंद राहणार आहे.या निर्णयाची अंमलबजावणी येत्या मंगळवार पासुन होणार आहे .

Please follow and like us:

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

error

Enjoy this blog? Please spread the word :)

Follow by Email