आज संकष्टी चतुर्थी निम्मित्त सर्वत्र भक्तिभावाचं वातावरण
आज संकष्टी चतुर्थी
आज संकष्टी चतुर्थी ! अर्थात श्री गणेशाच्या उपसनेचा दिवस.सर्व गणेशभक्तांसाठी हा दिवस पर्वणीचा ठरतो. संकष्टी चतुर्थी निमित्त आज भक्तगणात भक्तीभावाचं वातावरण आहे.आपल्या लाडक्या बाप्पांचं दर्शन घेण्यासाठी श्री गणेशाच्या मंदिरात आज भक्तांची गर्दी लोटली होती.
चतुर्थी हा गणेशाच्या उपासनेचा दिवस आहे.शुक्ल पक्षात येणा-या चतुर्थीला श्री विनायकी चतुर्थी तर कृष्ण पक्षात येणा-या चतुर्थीला श्री संकष्टी चतुर्थी असं संबोधलं जातं.तसेच मंगळवारी येणा-या संकष्टी चतुर्थीला श्री अंगारकी चतुर्थी तर मंगळवारी येणा-या श्री विनायकी चतुर्थीला श्री अंगारक योग विनयकी चतुर्थी म्हणून ओळखलं जातं.या सर्व दिवसांची महती पाहता श्री गणेश भक्तांसाठी हे पर्वणीचा दिवस ठरतात.
संकष्टी चतुर्थीला असंख्य भक्तगण उपवास धरतात.रात्री चंद्रोदयानंतर श्रींंचे आणि चंद्राचे दर्शन घेवुन हा उपवास सोडला जातो. आज संकष्टी चतुर्थीनिमित्त विविध ठिकाणी धार्मिक तसेच भक्तिपर सोहळयांचं आयोजन करण्यात येतं.श्रींचं दर्शन,पूजन,भक्ती,नामस्मरण,यातून आज सर्व वातावरण श्रीमय होतं.आपल्या लाडक्या दैवाताची भक्ती आणि पूजनात आज सर्व भक्तगण तल्लीन होवून जातात.आणि सर्वत्र नाद असतो तो श्री गणपती बाप्पा मोरयाचा !