आजपासून श्रीतिसाई देवीची यात्रा प्रारंभ
आजपासून श्रीतिसाई देवीची यात्रा प्रारंभ
कल्याण – आगरी समाजाचे व कल्याण डोंबिवलीतील असंख्य भाविकांचे श्रद्धास्थान श्रीतिसाई देवीची यात्रा आजपासून म्हणजेच हनुमान जयंतीपासून सुरु झाली आहे.सलग तीन ते पाच दिवस संपन्न होणा-या यात्रेदरम्यान असंख्य भाविक भक्तगण येथे दर्शनासाठी येतात. तिसाई देवीच्या यात्रेसाठी येणा-या भाविकांच्या सुविधेसाठी सर्व यंत्रणा सज्ज झाली आहे.यात्रे दरम्यान तिसाई देवी मंदिर येथे ठाणे जिल्ह्यातील अनेक राजकीय ,सामाजिक व व्यवसाय क्षेत्रातील मान्यवर देवीच्या दर्शनासाठी येतात.दरम्यान श्रीतिसाई देवीच्या दर्शनासाठी मंदिरात भाविकांची गर्दी लोटली आहे.
दरवर्षी हनुमान जयंतीच्या दिवशी या यात्रेची सुरुवात होते.शनिवार ३१ मार्च हनुमान जयंतीच्या दिवशी सकाळी ६ वाजता देवीचा अभिषेक व पूजा , ७ ते ९ पर्यंत देवीचा शृंगार व पुष्पसजावट संपन्न झाले. तर रात्री ९ वाजता देवीची भव्य पालखी मिरवणुक सुरु होणार आहे. .या यात्रे दरम्यान भाविकांनी श्रीतिसाई देवी दर्शनचा लाभ घ्यावा असे आवाहन जरीमरी तिसाई देवस्थान ,ग्रामस्थ पंच कमिटी ,जरिमरी सेवा मंडळ ,गावदेवी मित्र मंडळ,तिसाई ग्रामस्थ मंडळ व जरिमरी सेवा मंडळचे अध्यक्ष दत्ता गायकवाड यांनी केले आहे.तसेच रविवारी दुपारी यात्रे निमित्त तिसगाव गावदेवी मंदिरच्या मैदानात भव्य कुस्तीचे सामने आयोजित करण्यात आले आहेत.