आजपासून ठाणे जिल्ह्यात मतदारांकडून माहिती घेण्यासाठी अधिकारी घरोघरी

ठाणे दि 15 -2019च्या लोकसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर राज्य निवडणूक आयोगाच्या आदेशानुसार एक जानेवारी.2019च्या जन्मतारखेनुसार मतदार याद्याची विशेष संक्षिप्त स्वरूपात पुनरिक्षण मोहिम जिल्हा पातळीवर राबवण्यात येणार आहे. 15 मे ते 20जून या कालावधीत मतदान केन्द्रस्तरीय अधिकारी घरोघरी जाऊन माहिती  गोळा करणार आहेत.

ठाणे जिल्हा मतदार यादीतून  मयत,दुबार आणि स्थलांतरित अशी जवळपास 92.हजार 454 एवढ्या मोठ्या प्रमाणावर नावे वगळण्यात येणार आहेत अशी माहिती जिल्हा निवडणूक अधिकारी फरोग मुकादम यांनी आज एका पञकार परिषदेत दिली.  नव्याने तयार होणा-या मतदार यादीमध्ये 2011च्या जनगणनेनुसार 18ते 19वयोगटातील साडे तीन लाख तरूण मतदारांचा समावेश मतदार यादीत होणार असल्याचे ही मुकादम यानी सांगितले

ही माहिती शिक्षक शिक्षकेतर कर्मचा-यांच्या माध्यमातून गोळा करण्यात येते .माञ सध्या उन्हाळी सुटी असल्यामुळे शिक्षक रजेवर आहेत.परिणामी नियोजीत  मुदत वाढवून देणे किंवा महापालिकेने त्याचे कर्मचारी निवडणूक कामासाठी देण्यात यावे अशी विनंती निवडणूक आयोग आणि स्थानिक महापालिका आयुक्तांना करण्यात येणार असल्याचेही मुकादम यांनी सांगितले.

एक सप्टेंबर 2018 रोजी प्रारूप मतदार यादी तर 31आँक्टोबर पर्यंत दावे आणि हरकती स्विकारण्यात येणार असून 4जानेवारी 2019रोजी लोकसभा निवडणुकीसाठी अंतिम यादी तयार होईल,अशी माहिती फरोग मुकादम यांनी पत्रकारांना दिली.

सद्य परिस्थितीत जिल्ह्यात एकूण 5हजार 681मतदान केंद्र असून कोपरी पाचपाखाडी येथे 359मतदान केंन्द्र आहेत परंतू ठाण शहरात सुरू असणा-या रस्ता रुंदीकरणात अनेक मतदान केंन्द्र बाधित झाली असून त्याला पर्याय  म्हणून महापालिका आयुक्तांना नवीन जागा मतदान केन्द्रासाठी उपलब्ध करून देण्याविषयी सांगितले असल्याचेही मुकादम यानी सांगितले.

Please follow and like us:

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

error

Enjoy this blog? Please spread the word :)

Follow by Email