आक्षेपार्ह्य फोटो पाठवून तरुणीचे लग्न मोडले; नंतर केला अत्याचार
परळी – एका तरूणीच्या भावी पतीला व्हाटस्अॅपवरून तिचे आक्षेपार्ह्य फोटो टाकून होणारे लग्न मोडले आणि त्यानंतर तरूणीवर अत्याचार केल्याची धक्कादायक घटना परळी तालुक्यात घडली आहे.महिनाभरापूर्वी घडलेल्या या घटनेची तक्रार महाविद्यालयीन शिक्षण घेणाऱ्या या वीस वर्षाच्या तरूणीने पोलीसात रविवारी दिली असून गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
या पीडित तरूणीचे महिनाभरापूर्वी लग्न ठरले होते. याची माहिती आरोप उमेश दराडे या तरूणाला मिळाल्यानंतर त्याने या तरूणीचे आक्षेपार्ह्य फोटो तिच्या भावी पतीला व्हाटस्अॅपवरून पाठविले. यामुळे वराकडील मंडळींनी लग्न मोडले. यामुळे त्या तरूणीचा संपूर्ण परीवारालाच धक्का बसला.यानंतर २० मार्च रोजी पहाटे तीन वाजण्याच्या सुमारास उमेश हा त्या तरूणीच्या घराजवळ आला आणि तरूणी घरातून बाहेर आल्यानंतर तिला उचलून शेतात नेऊन अत्याचार केला.यासंदर्भात पीडित तरूणीने पोलीसांना रविवारी सर्व माहिती दिली असून आरोपी उमेश दराडे आणि बजरंग गुट्टे या दोन तरूणांविरोधात बलात्काराचा गुन्हा दाखल करण्यात आला आहे.