आईसक्रीम खाण्याच्या पैशावरून झालेल्या वादातून तरुणावर चाकूने हल्ला

कल्याण – आईस्क्रीम खाण्याच्या पैशावरून झालेल्या वादातून एका तरुणावर त्रिकूटाने चाकूने हल्ला केल्याची घटना कल्याण पूर्व खडगोलवली परिसरात घडली आहे .कल्याण पूर्व खडगोलवली येथील शिवराज कॉलनी येथे राहणारे दीपक गुप्तां 25 हा शनिवारी रात्री 10 वाजण्याच्या सुमारास आईस्क्रीम खाण्यासाठी गेला होता .यावेळी त्याचे आईस्क्रीम च्या पैशावरून इंदर सिंग,रोहित शर्मा व विकी शर्मा यांच्याशी वाद झाला .या वादामुळे संतापलेल्या त्रिकूटने दीपकला मारहाणं केली तर यावेळी विकी जे हातातील चाकूने दीपक वर  वार केले .या हल्ल्यात जखमी झाल्याने दीपक ला रुग्णालयात उपचारासाठी दाखल करण्यात आले आहे तर या प्रकरणी दीपकचे वडील रमेश गुप्तां यांनी कोळशेवाडी पोलिस स्थानकात तक्रार नोंदवली असून या तक्रारी नुसर पोलिसानी इंदर सिंग,रोहित शर्मा व विकी शर्मा विरोधात गुन्हा दाखल करत पुढील तपास सूरु केला आहे. 
Please follow and like us:

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

error

Enjoy this blog? Please spread the word :)

Follow by Email