आंतरराष्ट्रीय ख्यातीचे शिल्पकार प्रमोद कांबळे यांच्या मदतीसाठी डोंबिवलीत ६ मे ला डोंबिवलीत कलास्पर्श
‘डोंबिवलीकर आर्ट सोसायटी’आयोजित कलास्पर्श’..
(श्रीराम कांदु)
‘डोंबिवलीकर आर्ट सोसायटी’आयोजित कलास्पर्श’..या आगळयावेगळया कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले आहे. या कार्यक्रमात वेगवेगळया कलाक्षेत्रातील आंतरराष्ट्रीय कलाकार आपली कला सादर करणार आहे.यात जेवढा निधी जमा होईल तो सर्व निधी शिल्पकार प्रमोद कांबळे यांना याच कार्यक्रमात मान्यवरांच्या हस्ते देण्यात येणार आहे.
आंतरराष्ट्रीय ख्यातीचे शिल्पकार प्रमोद कांबळे यांच्या स्टुडिओला काही दिवसांपूर्वी आग लागली व सारे काही क्षणात संपले. एका कलाकाराचे आयुष्य उध्वस्त झाले….देशभरातून त्यांना आधार म्हणून सहानुभूतीची लाट उसळली. अनेक दानशूर व्यक्ती, संस्था पुढे आल्या व त्यांना मदतीचा ओघ सुरु झाला..आपणही यात पुढाकार घ्यावा म्हणूनच ‘डोंबिवलीकरआर्ट सोसायटी’आयोजित कलास्पर्श’..या अनोख्या कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले आहे.
रविवार ६ मे रोजी सावित्रीबाई फुले कलामंदिर येथे हा कार्यक्रम होणार आहे. या कार्यक्रमात वेगवेगळया कलाक्षेत्रातील आंतरराष्ट्रीय कलाकार आपली कला सादर करणार आहे. व विशेष म्हणजे सर्व कलाकार केवळ प्रमोद कांबळे यांच्या प्रेमाखातर एकही पैसा मानधन न घेता यात सहभागी होणार आहेत. या कार्यक्रमाला प्रवेशिका देणगी मूल्य आहे. तिकीट विक्रीतून जमा होणारा संपूर्ण निधी व संस्थांच्या माध्यामतून देणगी स्वरुपात जेवढा निधी जमा होईल तो एकूण सर्व निधी शिल्पकार प्रमोद कांबळे यांना याच कार्यक्रमात मान्यवरांच्या हस्ते देण्यात येणार आहे. आपण या मदत कार्यात जास्तीत जास्त सहभागी व्हावे असे आवाहन संस्थेच्या वतीने करण्यात आलंय.

Please follow and like us: