अल्पवयीन मुलीवर रुग्णवाहिकेत बलात्कार; नाराधमाला अटक
उल्हासनगर – उपचारासाठी रुग्णालयात दाखल करण्याच्या बहाण्याने एका ओळखिच्या रिक्षाचालाकाने अल्पवयीन मुलीवर गुंगीचे औषध देवून रुग्णवाहिनीत बलात्कार केल्याची धक्कादायक घटना विठ्ठलवाडी पोलीस ठाण्याच्या हद्दीत घडली आहे. पोलिसांनी या नराधमाला बेड्या ठोकल्या असून राहुल जाधव असे त्याचे नाव आहे.
याबद्दल अधिक वृत्त असे की,पिडीत मुलीच्या शारीरिक बदलाची आईने चौकशी केली असता मुलगी गर्भवती असल्याचा धक्कादायक प्रकार उघडकीस आला. पिडीत मुलीच्या आईने पिडीतेला घेवून विठ्ठलवाडी पोलीस ठाणे गाठले. व त्यावेळी अज्ञात आरोपी विरोधात बलात्काराचा गुन्हा दाखल केला. गुन्हा दाखल होताच बलत्कार करणाऱ्या अज्ञात आरोपी विरोधात पोलिसांनी एकीकडे तपास सुरु केला तर दुसरीकडे पिडीत मुलीकड़े महिला पोलीस अधिकाऱ्यांनी चौकशी केली.तेव्हा हा प्रकार उघडकीला आला.गेल्या महिन्यात पिडीत मुलगी आजारी पडल्याने ती घराबाहेर जात नव्हती. यामुळे नराधम राहुल तिला पाहण्यासाठी तिच्या घरी गेला. त्यावेळी पिडीत मुलगी आजारी असल्याने त्याने उपचारासाठी रुग्णालयात दाखल करण्याच्या बहाण्याने रुग्णवाहिका मागवली. त्यावेळी नराधमाने पिडीत मुलीला गुंगीचे औषध दिले. त्यानंतर रुग्णवाहिका आल्यावर तिला त्यामध्ये घेवून गेला. आणि तिच्यावर रुग्णवाहिकेतच बलात्कार केला. दरम्यान याप्रकरणी विठ्ठलवाडी पोलिसांनी या नराधमाला बेड्या ठोकल्या असून अधिक तपास पोलीस उपनिरीक्षक जाधव करीत आहेत.