अल्पवयीन मुलीला जंगलात नेवून अत्याचार ;आरोपी गाजाआड

बदलापुर-लग्नाचे अमिष दाखवत फिरायला जाण्याचे बहाण्याने एका १७ वर्षीय अल्पवयीन मुलीला जंगलात नेवून अत्याचार केल्याची घटना बदलापुर येथे घडली आहे. याप्रकरणी बदलापूर पश्चिम पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला असून, पोलिसांनी त्या आरोपीला अटक केली आहे.
बदलापूर पश्चिम पोलीस ठाण्याच्या हद्दीत राहणाऱ्या लतेश नाईक (३०) या रिक्षाचालकाने एका अल्पवयीन मुलीला लग्नाचे अमिष दाखवून आपल्या प्रेमाच्या जाळ्यात ओढले होते. त्यानंतर त्या नराधमाने तिला फिरायला घेऊन जाण्याच्या बहाण्याने स्वत:च्या रिक्षातून जंगल भाग असलेल्या निर्जनस्थळी नेले आणि त्याठिकाणी तिच्यावर जबरदस्तीने अत्याचार केला. या प्रकरणी पीडित मुलीच्या तक्रारीनुसार बदलापूर पश्चिम पोलिसांनी लतेश याच्याविरूध्द गुन्हा दाखल करून त्याला अटक केली आहे. अधिक तपास स.पो.निरीक्षक सावंत करीत आहेत.

Hits: 20

Leave a Reply

Your email address will not be published.

RSS
Follow by Email