अल्पवयीन मुलींवरील बलात्काऱ्याला आता फाशीची शिक्षा

नवी दिल्ली – अल्पवयीन (१२ वर्षाखालील) मुलीवर बलात्कार करणाऱ्यांना आता फाशीची शिक्षा ठोठावली जाणार आहे. लोकसभेत आज फौजदारी कायदा दुरुस्ती विधेयक २०१८ आवाजी मतदानाने मंजूर करण्यात आले. या कायद्यामुळे अल्पवयीन मुलींवर अत्याचार करणाऱ्यांना नराधमांना कठोरातील कठोर शिक्षा होण्यास मदत होणार आहे. 

उत्तर प्रदेशातील उन्नाव आणि जम्मू आणि काश्मीरमधील कठुआमध्ये अल्पवयीन मुलींवर बलात्कार करण्यात आल्यानंतर या कायद्यामध्ये बदल करण्याची मागणी करण्यात आली होती. फौजदारी कायदा दुरुस्ती विधेयक २०१८ ला सर्वच पक्षांनी पाठिंबा दिला. 

१२ वर्षाखालील मुलीवर बलात्कार करणाऱ्यांना कमीतकमी २० वर्षाची सक्तमजुरीची शिक्षा व फाशी ठोठावण्यात येईल. १२ वर्षाखालील मुलीवर सामूहिक बलात्कार केल्यास जन्मठेप व फाशीची शिक्षेची तरतुद केली आहे. १६ वर्षाखालील मुलींवर बलात्कार केल्यास २० वर्षाची शिक्षा होईल, तर सामूहिक बलात्कार केल्यास आजन्म जन्मठेप होईल. 

बलात्कार प्रकरणातील चौकशी दोन महिन्यात पूर्ण करण्याचे सक्तीचे करण्यात आले आहे. त्याचबरोबर १६ वर्षाखालील मुलीवर बलात्कार करणाऱ्या आरोपींना या कायद्यांर्गत अटकपूर्व जामीनाची कोणतीही तरतूद करण्यात आलेली नाही.

Please follow and like us:

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

error

Enjoy this blog? Please spread the word :)

Follow by Email