अल्पवयीन प्रेयसीवर अल्पवयीन प्रियकराचा लैंगिक अत्याचार; पीडिता गर्भवती

डोंबिवली – एका १५ वर्षीय अल्पवयीन मुलीवर शेजारी राहणाऱ्या १७ वर्षीय अल्पवयीन प्रियकराने तिच्या राहत्या घरात वांरवार लैंगिक अत्याचार केल्याची धक्कादायक घटना डोंबिवलित समोर आली आहे.

खळबळजनक म्हणजे अत्याचारामुळे पिडीत अल्पवयीन मुलगी २ महिन्याची गरोदर राहिल्याने हा प्रकार उघडकीस आला. याप्रकरणी पिडीत मुलीच्या जबानीवरून त्या १७ वर्षीय अल्पवयीन आरोपीला मानपाडा पोलिसांनी गजाआड केले आहे. मिळलेल्या माहितीनुसार मानपाडा पोलीस ठाण्याच्या हद्दीतील डोंबिवली पूर्व परिसरात पिडीत अल्पवयीन मुलगी आईवडील व भावासह राहते. तिच्याच शेजारी अल्पवयीन आरोपी हा राहत असल्याने ओळख निर्माण झाली. त्याच ओळखीचा फायदा घेवून आरोपीने पिडीत तरुणीच्या घरी गेल्या वर्षापासून जात असल्याने त्याने तिच्या बालमनाचा फायदा घेऊन तिला प्रेमाच्या जाळ्यात ओढले. त्यानंतर पिडीत मुलीचे आईवडील व भाऊ घरात नसताना नेहमीप्रमाणे तो तिच्या घरी येत – जात होता. १७ ऑक्टोबर २०१७ रोजीही पिडीत मुलीच्या घरी गेला. त्याने तिच्यावर अत्याचार करण्याचा प्रयत्न केला. मात्र पिडीत मुलीने विरोध केल्याने त्याने जीवेठार मारण्याची धमकी देवून तिच्या इच्छेविरोधात बलात्कार केला. त्यानंतरही तिच्यावर वारंवार अत्याचार करीत होता.  दरम्यान पिडीत मुलीच्या शारीरिक बदलाची आईने चौकशी केली असता पिडीत मुलगी २ महिन्याची गरोदर राहिल्याने हा धक्कादायक प्रकार उघडकीस आल्यानंतर पिडीत मुलीच्या आईने पिडीतेला घेवून मानपाडा पोलीस ठाणे गाठत तक्रार नोंदवली असून या तक्रारी नुसार  मानपाडा पोलिसांनी  ३७६३५२४५२३४२५०६व पोक्सा कलमाअंतर्गत गुन्हा दाखल करत त्याला अटक केली. त्यास बुधवारी बाल न्यायालयात हजर केले असता त्याची रवानगी बालसुधारगृहात करण्यात आली. या घटनेचा अधिक तपास महिला पोलीस उपनिरीक्षक जाधव करीत आहेत.

Please follow and like us:

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

error

Enjoy this blog? Please spread the word :)

Follow by Email