अल्पवयिन मुलीवर अत्याचार ; आरोपीला अटक
आईस्क्रीमच आमीष दाखवून अल्पवयिन मुलीचे अपहरण करून तीच्यावर अत्याचार करणा-या नाराधामाला पोलिसांनी अटक केली आहे.गुन्हा दाखल होताच अवघ्या २४ तासांच्या आत पोलिसांनी आरोपीला बेड्या ठोकल्या.
आरोपी सुमन नंदकुमार झा याने भांडुप येथून पाच वर्षाच्या मुलीच अपहरण केले. तिला आईस्क्रीम खायला देतो असे सांगुन तिला रिक्षा मधे बसवून ठाण्यातील माजिवडा येथे घेऊन आला , तिथून घोडबंदर येथील आझद नगर येथील खन्ना कंपाउड येथील पडीक जागेत आणून तिच्यावर अत्याचार केला व तिला तिथेच टाकुन पळून गेला , कापूर बावडी पोलीसांनी या तपास कामी चार टीम पाठवुन अवघ्या २४ तासाच्या आत आरोपीला अटक केली .मुलीची प्रकृती आता स्थिर असून , तिला सिव्हिल हॉस्पिटलमधे दाखल केले आहे पोलिसांच्या या कामगीरीबद्दल मुलीच्या आईवडिलांनी कापुरबावडी पोलिसांचे विशेष आभार मानले आहेत.
Please follow and like us: