अर्थसंकल्प व गुंतवणूकीच्या संधी विषयावर मोफत व्याख्यान

(श्रीराम कांदु)
डोंबिवली : पालकमंत्री एकनाथ शिंदे यांच्या वाढदिवसाचे औचित्य साधून शिवसेना मध्यवर्ती शाखा डोंबिवली तर्फे शहरात विविध कार्यक्रम आयोजित केले आहेत. त्याचाच भाग म्हणून प्रसिद्ध अर्थतज्ञ चंद्रशेखर टिळक यांचे अर्थसंकल्प व गुंतवणूकीच्या संधी विषयावर व्याख्यान आयोजित केले आहे. सदर मोफत व्याखान कार्यक्रम ९ फेब्रुवारी रोजी आदित्य मंगल कार्यालय, डोंबिवली पूर्व येथे ६.३० वाजता होणार आहे. सदर कार्यक्रमास उपस्थित राहावे अशी विनंती डोंबिवली शिवसेना शहर प्रमुख तथा सभागृह नेता राजेश मोरे यांनी केली आहे.
Please follow and like us:

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

error

Enjoy this blog? Please spread the word :)

Follow by Email