अमृत अभियानांतर्गत कडोंमपाच्या १३२ कोटी रुपयांच्या मल:निसारण प्रकल्पाला मंजुरी
कल्याण – केंद्र शासनाच्या अमृत अभियाना अंतर्गत राज्याच्या ३२८० कोटी रुपयांच्या वार्षिक कृती आराखड्यास नुकतीच मान्यता देण्यात आली आहे. या आराखड्यात कल्याण डोंबिवली शहराच्या मल:निसारण प्रकल्प टप्पा -२ चा समावेश करण्यात आला आहे. त्यामध्ये महापालिका क्षेत्रातील नाले जोडणी, सांडपाणी पंपगृह उभारणे, सांडपाणी प्रक्रिया केंद्र उभारणे व त्यासाठी मशिनरी अशा कामांचा समावेश आहे. त्यासाठी १३२.८२ कोटी रुपये खर्च येणार असून त्याकरिता केंद्र आणि राज्य शासनाकडूनही निधी मिळणार आहे. या या प्रकल्पाच्या प्रशासकीय मंजुरीबाबतचा शासन निर्णय नगरविकास विभागाने आज जारी केला आहे.
Please follow and like us: