अभिनेत्री ममता कुलकर्णीची मुंबईतील तीन फ्लॅट्स सील करण्याचा आदेश

ठाणे – बॉलिवूडमधील माजी अभिनेत्री ममता कुलकर्णीची संपत्ती सील करण्याचा आदेश ठाण्यातील विशेष एनडीपीएस कोर्टाने दिला आहे. एनडीपीएसच्या विशेष न्यायालयाचे न्यायाधीश एच. एम. पटवर्धन यांनी अंमली पदार्थांच्या तस्करीप्रकरणात ममता कुलकर्णी हजर न झाल्याने मुंबईतील विविध भागात असलेले तीन फ्लॅट्स सील करण्याचा आदेश मागील आठवड्यात दिला होता. ममताच्या या तीन फ्लॅट्सची किंमत सुमारे 20 कोटी रुपये असल्याचं म्हटलं जात आहे.दोन वर्षांपूर्वी या प्रकरणात ममता कुलकर्णीला विकी गोस्वामीसह मुख्य आरोपी बनवण्यात आलं होतं. अंमली पदार्थांच्या तस्करीत तिचा समावेश होता. “ममता कुलकर्णी आणि विकी गोस्वामी यांच्या आत्मसमर्पणाचा प्रयत्न करु,” असं ठाणे पोलिसांनी सांगितलं होतं.ममता कुलकर्णी आणि तिचा कथित पती विकी गोस्वामी सध्या ते केनियात राहत असल्याचं कळतं. 6 जून 2017 रोजी ठाणे कोर्टाने गोस्वामी आणि कुलकर्णीला फरार घोषित केलं होतं. यानंतर ममता कुलकर्णीची संपत्ती सील करण्यासाठीबाबतचा अर्ज पोलिसांनी कोर्टात केला होता. कोर्टाने ममताची संपत्ती सील करण्याचा अर्ज प्रलंबित ठेवला होता आणि दोन्ही फरार आरोपींना हजर राहण्यासाठी एक संधी दिली होती. परंतु दोघेही कोर्टात हजर राहण्याची कोणतीही शक्यता नसल्याचं समोर आल्यावर न्यायाधीशांनी तिची संपत्ती जप्त करण्याचा आदेश दिला.

Please follow and like us:

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

error

Enjoy this blog? Please spread the word :)

Follow by Email