अनोखे व्यक्तीमत्व करणार “भावनाची” पाठवणी,गोरज मुहूर्तावर होणार विवाह सोहळा

(श्रीराम कांदु)
     दानशूर व्यक्तीमत्व म्हणून ओळखले जाणारे महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे जेष्ठ नेते तथा परिवहन समिती सदस्य प्रल्हाद म्हात्रे  यांनी   “दानशूरतेचा” एक आगळा वेगळा आदर्श उभा केला आहे. मानलेल्या कन्येच्या  लग्नाचा खर्च ते करणार असून रविवारी सायंकाळी गोरज मुहूर्तावर या भावना नावाच्या मानलेल्या कन्येचा विवाह डोंबिवलीच्या गोपी माँलमधील  सेलिब्रेशन हाँलमध्ये पार पडणार आहे.
    भावना ही डोंबिवलीतील दिपक अंबालाल पटेल यांची ती कन्या आहे. भावनाची आई काही दिवसांपूर्वी फार आजारी होत्या. या आजारापायी त्यांना केईएम ईस्पितळात दाखल कराव लागल होत. त्यावेळी प्रल्हाद म्हात्रे यांनी त्यांना वैद्यकीय मदत व आर्थिक सहकार्य केले. या प्रसंगातून  म्हात्रे “भावनाला” मुलगी मानू लागले. याबाबत प्रल्हाद म्हात्रे म्हणाले की, मी माझे कर्तव्य आणि साजजिक बांधिलकी भावनेतून हे कार्य करीत आहे. आर्थिकरित्या दुर्बल असलेले सफाई कामगार, मजूर, तसेच गरिब–वंचितांसाठी मदतीचा हात पुढे करतो. आमचं बालपण गरिबीत गेले त्यामुळे “गरीबी” काय असते ते चांगले माहित आहे. आई तांदूळ विकायची, पण त्याही परिस्थितीत आई लोकांना मदत करायची आणि हेच संस्कार अंगवळणी आहेत. त्यामुळे शक्य असेल तेवढी मदत करतो. चिमुकल्याची शस्त्रक्रिया, इमारत दुरघटनेतील बाधितांचे पुनर्वसन,  परिवहन सदस्य म्हणून मानधन न घेता कर्मचाऱ्यांच्या मुलांना शैक्षणिक मदत, साहित्य संमेलनाला लाखाची देणगी अशी सामाजिक बांधिलकी जपणाऱ्या म्हात्रेंच्या कार्याची दखल घेवून महापौर राजेंद्र देवळेकर यांनी सभागृहात तर परिवहन सभापती संजय पावशे यांनी समितीच्या कार्यालयात प्रल्हाद म्हात्रे यांचा जाहीर सत्कार केला
Please follow and like us:

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

error

Enjoy this blog? Please spread the word :)

Follow by Email