अनैतिक संबंधाच्या संशयावरून ट्रक चालकाचा खून

माजलगाव – तालुक्यातील फुले पिंपळगाव येथील शेख बुरान शेरखान पठाण (वय ३०) या ट्रक चालकाचा मृतदेह शनिवार, दि २६ रोजी गावा शेजारील शेतात आढळून आला. अनैतिक संबंधाच्या संशयावरून त्याचा खून केल्याच्या नातेवाईकाच्या तक्रारीवरून मनूरवाडी येथील दांपत्यावर शहर पोलिसात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

पोलीस सूत्रांकडून मिळलेल्या माहितीनुसार ट्रक चालक शेख बुरान याचा मृतदेह फुले पिंपळगाव शिवारातील टवानी यांच्या शेतात पडलेला होता. मयताचा भाऊ सकाळी प्रातर्विधीसाठी खूनच असल्याचा संशय व्यक्त केला. यामुळे गावात एकच खळबळ उडाली. पोलिसांनी घटनास्थळी जाऊन पंचनामा करून प्रेत शवविच्छेदनासाठी ग्रामीण रुग्णालयात पाठविले. मयताचा भाऊ पठाण खदीर शेरखान पठाण यांनी शहर पोलीस ठाण्यात दिलेल्या फिर्यादीत म्हटले आहे की, मयत शेख बुरान याचे मनूरवाडी येथील एक महिलेसोबत अनैतिक संबंध होते. तो त्या महिलेला फोनवर तासनतास बोलत होता. हे त्या महिलेच्या पतीला माहीत झाल्याने त्याने शेख बुरान याला घरी येऊन जीवे मारण्याची धमकी दिली होती. यामुळे अखिला सय्यद गुलाब, सय्यद गुलाब सय्यद दगडू यांनीच माझ्या भावाचा खून केल्याची फिर्याद दिली. यावरून वरील दोन्ही आरोपीविरुद्ध शहर पोलीस ठाण्यात खुनाचा गुन्हा दाखल करण्यात आला असून पुढील तपास पोलीस निरीक्षक राजीव तळेकर हे करीत आहेत.

Please follow and like us:

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

error

Enjoy this blog? Please spread the word :)

Follow by Email