अनधिकृत बांधकाम केल्याप्रकरणी बिल्डर विरोधात गुन्हा दाखल
(श्रीराम कांदु)
कल्याण दि.०१ – २७ गावांमधील पिसवली येथे महापालिकेची परवानगी न घेता अनधिकृत पणे इमारत उभारल्या प्रकरणी राकेश शर्मा या बिल्डर विरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
कल्याण पूर्व मलंग रोड पिसवली येथील अनमोल गार्डन शेजारी चैतन्य पॅलेस ही इमारत उभारण्यात आली आहे. दरम्यान सदर इमारत महापालिकेची कोणतीही बांधकाम परवानगी न घेता उभारन्यात आल्याचे निदर्शनास आल्याने या प्रकरणी संबंधित बिल्डर राकेश शर्मा विरोधात प्रभाग क्षेत्र अधिकारी शरद पाटील यांनी कोळशेवाडी पोलीस स्थानकात तक्रार दाखल केली असून या तक्रारी नुसार पोलिसानी महाराष्ट्र प्रादेशिक व नगररचना अधिनियम १९६६ चे कलम ५२ व ५३ प्रमाणे व महाराष्ट्र महानगर पालिका अधिनियम १९४९ चे कलम ३९७ अ (१) प्रमाणे राकेश शर्मा या बिल्डर विरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. सदर बिल्डर हा शिवसेनेचा पदाधिकारी असल्याचे बोलले जात आहे.