अनधिकृत बांधकामावर कारवाई करण्यास गेलेल्या अधिका-याला शिवीगाळ व धमकी
डोंबिवली – अनधिकृत बांधकामावर कारवाई करण्यास गेलेल्या प्रभाग क्षेत्र अधिका-याला कारवाई स विरोध करत त्यांना शिवीगाळ व धमकी दिल्याची घटना डोंबिवलीत घडली आहे .या प्रकरणी डोंबिवली पोलीस स्थानकात गुन्हा दाखल करण्यात आला आहे .
कल्याण डोंबिवली महानगर पालिकेचे ग प्रभाग क्षेत्र अधिकारी परशुराम कुमावत काल दुपारच्या सुमारास डोंबिवली पूर्वेकडील प्रगती कोलेज समोरील शेरुबाई निवास या इमारतीच्या येण्या जाण्याच्या वहीवाटीच्या रस्त्यामध्ये करण्यात आलेले वितेचे बांधकाम निष्कासित करण्यास गेले असता पूजा पाटील ,त्यांची आई व भाऊ यांनी कुमावत यांना शिवीगाळ करत धमकी देत कारवाईस विरोध केला या प्रकरणी कुमावत यांनी सरकारी कामात अडथला व शिवीगाळ व धमकी दिल्या प्रकरणी डोंबिवली पोलीस स्थानकात तक्रार नोंदवली असून या तक्रारी नुसार पोलिसांनी पूजा पाटील ,त्यांची आई व भाऊ विरोधात गुन्हा दाखल करत पुढील तपास सुरु केला आहे