अनधिकृत बांधकामाची तक्रार केल्याने आरटीआय कार्यकर्त्यावर जीवघेणा हल्ला

डोंबिवली दि.२२ – डोंबिवली पश्चिमेकडील अनधिकृत बांधकामाची तक्रार केल्याने आरटीआय कार्यकर्त्यावर पाच ते सहा जणांनी जीवघेणा हल्ला केल्याची घटना शनिवारी सकाळी ११ वाजण्याच्या सुमारास आनंद नगर परिसरात घडली. या हल्ल्यात जखमी झालेल्या तरुणास पालिकेच्या शास्त्रीनगर रुग्णालयात दाखल केल्यानंतर पुढील उपचारासाठी कळवा येथील छत्रपती शिवाजी महराज रुग्णालयात हलविण्यात आले आहे. या प्रकरणी विष्णूनगर पोलीस ठाण्यात हल्लेखोरांविरोधात तक्रार दाखल केली आहे.

विनोद गंगाराम जोशी असे जखमी झालेल्या तरुणाचे नाव आहे. विनोद आपली दुचाकीवरून आनंद नगर येथून जात असताना त्या रस्त्यावर रिक्षातून आलेल्या पाच ते सहा जणांनी अचानक त्याच्या गाडीसमोर रिक्षा उभी केली. तोंडावर रुमाल बांधून आलेल्या हल्लेखोरांनी विनोदला हॉकी स्टिक आणि लाकडी दांडक्याने मारण्यास सुरुवात केली. जखमी विनोद ने आपला जीव वाचविण्यासाठी बेशुद्ध होण्याचे नाटक केले. हल्लेखोरांनी त्याला बेशुद्ध झाल्याचे पाहून पळ काढला. विनोदचा भाऊ कल्पेश जोशी या हल्ल्यामागे अनधिकृत बांधकामाची काही विकासकांचा हात असल्याचा संशय व्यक्त केला आहे. विनोद याने अनधिकृत बांधकामाबाबत उपोषणाचा इशारा दिला होता. दरम्यान अनधिकृत बांधकामांची तक्रार केल्यास अश्या प्रकारे मारहाण होत असेल तर नागरिकांच्या सुरक्षिततेच्या प्रश्न निर्माण होत असल्याची चर्चा सुरु झाली आहे.

Please follow and like us:

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

error

Enjoy this blog? Please spread the word :)

Follow by Email