अखिल भारतीय विद्यार्थी परिषदेतर्फे “राष्ट्रपुरुष डॉ. बाबासाहेब आंबेडकर”या व्याख्यानाचे आयोजन
डोंबिवली-अखिल भारतीय विद्यार्थी परिषदेतर्फे शनिवार दिनांक ५ मे रोजी “राष्ट्रपुरुष डॉ. बाबासाहेब आंबेडकर” या व्याख्यानाचे आयोजन करण्यात आले आहे. विनायक सभागृह, दुसरा मजला, श्री गणेश मंदिर संस्थान, डोंबिवली (पू) येथे संध्याकाळी ७ वाजता सदर व्याख्यान संपन्न होणार आहे.या कार्यक्रमाला अ. भा. वाल्मिकी महासभेच्या राष्ट्रीय महासचिव डॉ. रेखा बहनवाल या प्रमुख पाहुण्या म्हणून तर सहकार भारतीचे राष्ट्रीय संघटनमंत्री संजय पाचपोर हे प्रमुख वक्ते म्हणून उपस्थित असतील.या कार्यक्रमाला नागरिकांनी मोठ्या संख्येने उपस्थित रहावे असे आवाहन आयोजकांच्या वतीने करण्यात आले आहे.
Please follow and like us: