अखिल भारतीय मराठी व्यंगचित्रकार संमेलन व हास्यप्रदर्शनाचा शुभारंभ

ठाणे : कार्टूनिस्ट कंबाईन आयोजित अखिल भारतीय मराठी व्यंगचित्रकार संमेलन व हास्यप्रदर्शन पाचपाखाडी येथील ज्ञानराज सभागृह येथे संपन्न होत आहे. शनिवार 20 आणि रविवार 21 जानेवारी असे दोन दिवस हे संमेलन संपन्न होत असून आंतरराष्ट्रीय किर्तीचे ज्येष्ठ चित्रकार सुहास बहुलकर यांच्या हस्ते व ज्येष्ठ अभिनेते जयंत सावरकर यांच्या उपस्थितीत या संमेलनाचा शुभारंभ झाला. यावेळी अखिल भारतीय मराठी व्यंगचित्रकार संमेलनाचे अध्यक्ष, ज्येष्ठ व्यंगचित्रकार विवेक मेहेत्रे, ज्येष्ठ व्यंगचित्रकार प्रभाकर झळके, चारुहास पंडीत,आदी मान्यवर उपस्थित होते. व्यंगचित्रकारांच्या ओळखी, भेटी व परिचय असा कार्यक्रमही यावेळी संपन्न झाला. यात परिसंवाद, मनोरंजनात्मक कार्यक्रम, भव्य प्रदर्शन आशा विविध कार्यक्रमांचा समावेश आहे.

Please follow and like us:

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

error

Enjoy this blog? Please spread the word :)

Follow by Email