अंबरनाथ शहरातील रस्ते ,चौक, गार्डन,शाळा यांना लवकरच नावे देणार

लवकरच समिती स्थापन करून सूचना मागवण्यात येणार

अंबरनाथ – अंबरनाथ शहरातील विविध चौक,नगरपालिकेच्या शाळा, रस्ते, गार्डन, मैदाने यांना नगरपरिषदेने नाव न दिल्याने त्यांना विविध प्रकारच्या नावाने ओळखले जाते, या विषयी नगराध्यक्षा सौ. मनीषा वाळेकर यांनी शहरातील सर्व पक्षीय गटनेते, सभापती, नगरसेवक, शहर प्रमुख, विविध संस्थाचे सदस्य याची बैठक घेऊन याविषयीची महत्त्वाची चर्चा केली, या विषयी लवकरच एक सर्व पक्षीय समिती स्थापन करणार असल्याचे देखील सांगण्यात आले. तर या नामांतराच्या विषयात राजकारण्यांच्या नावांना कात्री देऊन देशातील शास्त्रज्ञ, खेळाडू, महापुरुषांची नावे, साहित्यिक, स्वतंत्र सैनिक यांची नावे देण्यात येणार आहेत. १५ आँगस्ट पर्यंत ही काम पूर्ण करण्याचा मानस समितीपुढे असणार आहे असे एका मताने मंजूर करण्यात आला आहे. या नामांतर विषयामध्ये नगरपालिका सर्व नगरसेवक, स्थानिकांना विश्वासात घेऊन काम करणार असल्याचे शिवसेना शहरप्रमुख अरविंद(अण्णा) वाळेकर यांनी सांगितले. यामुळे अंबरनाथ शहरात रस्ते व शाळांना एक विविध प्रकारची नाव देण्यात येणार असल्याने तरूणाई समोर एक चांगला आदर्श निर्माण होईल असे यावेळी बोलताना ते म्हणाले. आमदार डॉ. बालाजी किणीकर यांनी ही या चर्चेत सहभाग घेतला.सदर प्रकरणी समिती स्थापन झाल्या नंतर सर्वानुमते आलेल्या प्रस्तावांचा विचार करून शहरातील नगरपरिषदेच्या शाळा, गार्डन, रस्ते,प्रमुख ठिकाणे, मैदाने यांना नावे देण्याबाबत आलेल्या प्रस्तावानुसार व सूचनांन नुसार नागरपरिषदेच्या सर्व साधारण सभे पुढे विषय मांडण्याचा संकल्प नगराध्यक्षा सौ.मनीषा वालेकर यांनी व्यक्त केला.

या बैठकीला शिवसेना शहरप्रमुख अरविंद(अण्णा) वाळेकर, आमदार डॉ. बालाजी किणीकर, नगराध्यक्षा सौ. मनिषा अरविंद वाळेकर, उपनगराध्यक्ष अब्दुल शेख, विजय पवार, भरत फुलोरे, सौ.वृषाली पाटील(सभापती नियोजन समिती),रवींद्र पाटील (सभापती आरोग्य समिती),दीपक चौव्हान(उप मुख्य अधिकारी)नगरसेवक निखिल वाळेकर,राजेंद्र वाळेकर, पंकज पाटील,अनिता आदक, भरत फुलोरे, मनीष भामरे(सिटी इंजिनिअर) राजेंद्र हवल(प्रकल्प अधिकारी), राजेश तडवी(उप अभियंता बांधकाम)  मोरखंडीकर , नितीन शिंदे(न.प.अधिकारी)मंगेश सोनार (न.प.अधिकारी),श्रीमती डॉ. माहेश्वरी, डॉ.पूर्वा अष्टपुत्रे(भगिनी मंडळ शाळा सेक्रेटरी) अनुराधा जुवेकर भगिनी मंडळ शाळा सदस्य), अजित म्हात्रे, अरविंद मालुसरे (विभाग प्रमुख) श्रीनिवास वाल्मिकी, विष्णू पाटील, प्रभाकर केलनकर, ईश्वर चव्हाण(उद्योजक) तसेच पत्रकार राजेश जगताप, कमर काझी, शरद पवार, पंकज पाटील, शहरातील सर्व पक्षांचे प्रमुख नेते व पत्रकार हजर होते.

Please follow and like us:

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

error

Enjoy this blog? Please spread the word :)

Follow by Email