अंगारकी चतुर्थी निमत्त सर्वत्र भाक्तिभावाचे वातावरण
आज अंगारकी चतुर्थी ! या दिवसाला श्रीगणेशभक्तात अनन्यसाधारण महत्व आहे.हा दिवस श्रींच्या भक्तगणांसाठी फारच पर्वणीचा असतो.चतुर्थी हा दिवस गणेश उपासनेत फारच महत्वाचा असतो.शुक्ल पक्षातील चतुर्थीला विनायकी चतुर्थी म्हणून तर कृष्ण पक्षातील चतुर्थीला संकष्टी चतुर्थी म्हणून संबोधले जाते.मंगळवारी येणा-या विनायकी चतुर्थीला अंगारक योग विनयकी म्हणून संबोधतात तर मंगळवारी येणा-या संकष्टी चतुर्थीलाला अंगारकी चतुर्थी संपन्न होते.अंगारकी चतुर्थीचे व्रत केल्याने वर्षभरातील संकष्टी व्रत केल्याचे फळ लाभते.
पृथ्वीचा पुत्र अंगारक (मंगळ)याच्या तपाने प्रसन्न झालेल्या भक्तवत्सल श्रीगजननाने त्याला आशीर्वाद देत ग्रहमंडळात स्थान दिले.अंगारक याला श्री प्रसन्न झाले त्या दिवशी मंगळवार व कृष्ण पक्षातील चतुर्थी होती.तो दिवस सर्व भक्तांना फलदायी ठरावा म्हणून बप्पांनी हा दिवस सर्व भक्तांना फलदायी ठरेल असा वर दिला अशी या अंगारकी चतुर्थीची कथा आहे.
अंगारकी चतुर्थी आज सर्वत्र भक्तीभावात संपन्न झाली.यावेळी भजन,पूजन,आरती,श्रींचे नामस्मरण यांनी वातावरण श्रीगणेशमय झाले आहे.श्रींच्या मंदिरात भक्तागणांची गर्दी लोटली होती.
टीटवाळा येथील महागणपती,प्रभादेवी येथील श्रीसिद्धिविनायक मंदिर यांसह सर्वच श्रींच्या मंदिरात दर्शनासाठी भक्तांनी गर्दी केली होती.यानिमित्त विविध धार्मिक व भाक्तिपर कार्यक्रमांचेही आयोजन करण्यात आले होते.आणि सर्वत्र नाद होता तो श्री गणपती बप्पा मोरयाचा …
अंगारकी चतुर्थीनिमित्त टीटवाळा येथील श्रीसिद्धिविनायक मंदिरात रात्रिपासुनाच महागणपतीच्या दर्शनासाठी भक्तगणांची गर्दी लोटत आहे.