अंगणवाडी सेविकेचा विनयभंग; प्रकल्प अधिकाऱ्यावर गुन्हा
बीड – पाच महिन्यापासून थकीत असलेल्या वेतनासंदर्भात पाठपुरावा करणाऱ्या अंगणवाडी सेविकेचा विनयभंग केल्याच्या आरोपावरून बीड येथील महिला व बालकल्याण प्रकल्प अधिकारी जगदीश मोरे याच्यावर गुन्हा नोंदविण्यात आला.
याप्रकरणी पिडीत अंगणवाडी सेविकेने फिर्यादीत नमूद केले आहे कि, तिचे पाच महिन्यापासुंचे वेतन रखडले आहे. यासंदर्भात विचारणा करण्यासाठी बीड येथील महिला व बालकल्याण प्रकल्प अधिकारी जगदीश मोरे याच्या कार्यालयात गेली. वेतन रखडल्याबद्दल तिने विचारणा करताच ‘तुला पगार पाहिजे असेल तर वैयक्तिक घरी येऊन भेट, तरच तुझ्या पगारीचा विचार केला जाईल’ असे म्हणत तिच्या हाताला धरून नंतर विनयभंग केला. यावेळी पिडीतेने कशीबशी सुटका करून घेतली आणि कार्यालयाबाहेर आली. तिच्या पाठोपाठ मोरे देखील बाहेर आला आणि तिथे असलेल्या इतर महिलांसमोर त्याने पिडीतेला पुन्हा अपमानित केले. त्यांनर पिडीतेने घडलेली घटना तिच्या मुलाला सांगतली असा घटनाक्रम तिने फिर्यादीत नमूद केले आहे.
सदर पिडीत अंगणवाडी सेविकेने दिलेल्या फिर्यादीवरून महिला व बालकल्याण प्रकल्प अधिकारी जगदीश मोरे याच्यावर कलम ३५४ अन्वये शिवाजीनगर ठाण्यात गुन्हा नोंदविण्यात आला असून पुढील तपास फौजदार रफियोद्दीन शेख करत आहेत.