अंकुर सामाजिक संस्था आणि महराष्ट्र ट्रेन ग्रुपची गरीब विद्यार्थ्यांना मदत

(श्रीराम कांदु)

डोंबिवली,दि. २० -अंकुर सामाजिक संस्था आणि महराष्ट्र ट्रेन ग्रुप यांच्या संयुक्त विद्यमाने कल्याण-मुरबाड रोड वरील बघारे पाडा येथील जिल्हा परिषदेच्या शाळेत विद्यार्थ्यांना शालेय साहित्याचे वाटप करण्यात आले. विशेष म्हणजे याप्रसंगी पोलीस अधिकारी राजपूत यांनी उपस्थित दर्शवून विध्यार्थ्यांना मार्गदर्शन केले.

हेही वाचा :- रणांगण या चित्रपटात प्रेक्षकांना पाहायला मिळतोय एक वेगळा स्वप्निल

   यावेळी महाराष्ट्र ट्रेन ग्रुपचे निलेश देशमुख, अंकुर सामाजिक संस्थेचे निखील म्हात्रे, समीर भोईर, मनोज गिरी, रुपेश भोईर , संदीप जेस्वाल, पवन किरंगे, अशोक पवार, स्वप्नील भालेराव,अक्षदा भोसले आदींनी यावेळी विद्यार्थ्याशी गप्पा मारल्या. यावेळी अक्षदा भोसले यांनी अश्या गरीब आणि गरजू विद्यार्थ्यांना संस्थेच्या वतीने मदत करून समाजकार्यात खारीचा वाटा उचलत असतो असे सांगितले.यावेळी काही विद्यार्थ्यांनी देशासाठी काहीतरी करणार असल्याचे सांगताना उपस्थित सर्वांचे डोळे पाणावले. संस्थेची मदत पाहून विद्यार्थी आणि शिक्षकांनी संस्थेचे आभार मानले.

हेही वाचा :-अभिनेते आदेश बांदेकर यांना राज्यमंत्रीपदाचा दर्जा

Please follow and like us:

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

error

Enjoy this blog? Please spread the word :)

Follow by Email